हिरा शोधण्याच्या नादात सोन्यासारखा खेळाडू गमावला, मोहम्मद कैफचं वर्मावर बोट!

भारतीय संघ आता पुढच्या वर्षी 2023 (ODI World Cup 2023) च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संघामध्ये अनेक बदल करताना दिसला आहे. याचाच धागा पकडत मोहम्मद कैफनं निशाणा साधला आहे.

Updated: Nov 28, 2022, 09:20 PM IST
हिरा शोधण्याच्या नादात सोन्यासारखा खेळाडू गमावला, मोहम्मद कैफचं वर्मावर बोट! title=

Mohammed Kaif On Indian Cricket Team : भारतीय संघ आता पुढच्या वर्षी 2023 (ODI World Cup 2023) च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संघामध्ये अनेक बदल करताना दिसला आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये (IndvsNz) तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात आली आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता तिसरा सामना 'करो या मरो' असा असणार आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने (mohammed kaif) खेळाडूंच्या निवड समितीवर निशाणा साधला आहे. (T20 World Cup trending mohammed kaif on indian cricket team latets marathi sport news)

काय म्हणाला मोहम्मद कैफ? 
इंग्लंडच्या संघाने नुकताच टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्या विजेत्या संघामध्ये बहुतेक खेळाडूंचं सरासरी वय हे 31 वर्षे होतं. भारतासाठी गोलंदाजी मोठी समस्या आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेला शार्दुल ठाकूर दुसरा वनडे खेळला नाही तर मोहम्मद सिराज खेळला असता तर त्याला घरी पाठवलं आहे.त्यामुळे नव्या खेळाडूंच्या शोधात आपण जुन्या खेळाडूंना विसरत चाललो आहोत, मोहम्मद कैफ म्हणाला.

दुसरीकडे भुवनेश्वरसारखा खेळाडू संघात का नाही हे मला माहित नाही. तो एक चांगला गोलंदाज आहे, एक जुनी म्हण आहे. हिरा शोधण्याच्या नादात सोन्यासारखा खेळाडू गमावत असल्याचं मोहम्मद कैफने म्हटलं आहे. यावेळी बोलताना कैफने उमरान मलिकबद्दलही वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे तिघेही सारख्याच वेगाने गोलंदाजी करतात. जर वर्ल्डकपमध्ये 145 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज कोण असेल तर तो उमरान मलिक असल्याचं कैफने सांगितलं.