Virat Kohli T20 World Cup 2022: टी20 वर्ल्ड कपमध्ये चार पैकी तीन सामने जिंकत टीम इंडियाने (Team India) सेमीफायनलचं (Semi Final) तिकिट जवळपास निश्चित केलं आहे. आता रविवारी भारताचा सुपर12 मधला पाचवा आणि शेवटचा सामना झिम्बाव्बे (india vs Zimbabwe) विरुद्ध रंगणार आहे. हा सामना जिंकत सेमीफायनलचं तिकिट पक्क करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पण भारतीय संघाने खेळलेल्या दोन सामन्यात नो बॉलवरुन (No Ball) वाद रंगला असून काही खेळाडूंनी यावर टीका केली आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) सामन्यात नोबॉलचा वाद सध्या चर्चेत आहे.
विशेष म्हणजे दोनही सामन्यात फलंदाजी विराट कोहली करत होता आणि दोन्ही वेळा अंपायरने विराट कोहलीच्या बाजूने कौल दिला होता. यावरुन आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटर वकार युनिसने (Waqar Younis) मोठा आरोप केला आहे. विराट कोहली नो बॉलसाठी अंपायवर (umpire) दवाब टाकत असल्याचं वकार युनूसने म्हटलं आहे.
विराट कोहलीवर आरोप
वकार युनूसच्या म्हणण्यानुसार विराट कोहली फलंदाजी करत असताना हाताने नोबॉलचा इशारा करतो, त्यामुळे अंपायरवर दवाब येतो. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननेही (Shakib Al Hasan) कोहलीने सांगितल्यामुळे अंपायरने नोबॉल दिला असं म्हटलं होतं. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध बांगलादेशदरम्यानच्या सामन्यात भारताने 5 धावाने बांगलादेशवर मात केली. 44 धावात 64 धावा करणारा विराट कोहली या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. या सामन्यात विराट कोहली आणि शाकिब अल हसनदरम्यान वादही झाल्याचं पाहिला मिळालं होतं.
हे ही वाचा : Virat Kohli आणि Anushka Sharma ची रोजची कमाई लाखोत, पाहा कोणाची कमाई सर्वात जास्त
16 षटकात नोबॉलवरुन वाद
भारतीय संघ फलंदाजी करत असताना सोळाव्या षटकात हा वाद झाला. बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूदने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. ज्यावर विराट कोहलीने एक रन घेतला. पण अंपायरने हा नो बॉल दिला. कारण षटकातला तो दुसरा आखूड टप्प्याचा चेंडू होता. विराट कोहलीने हाताने इशारा करत नो बॉलची मागणी केली. विराट कोहलीने केलेल्या इशाऱ्यावर शाकिब अल हसनने आक्षेप घेत अंपायरशी वाद घातला. यात कोहलीने मध्यस्थी केली त्यामुळे वाद वाढला.
अंपयारवर दबाव वाढतो
याच गोष्टीवरुन वकार युनूसने टीका केली आहे. विराट कोहली हा मोठा खेळाडू आहे. त्याने केलेल्या अपीलमुळे अंपायरवर दबाव वाढतो असं वकारने म्हटलं आहे.