पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी20 वर्ल्ड कप (T20 world cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अवघे शेवटचे काही सामने बाकी आहेत, त्यानंतर सेमी फायनलची (Semi final) लढत होणार आहे. आता दोन्ही ग्रुपमधील 7 संघामध्ये सेमी फायनलची लढत होणार आहे. दरम्यान कोणत्या संघाचे सेमी फायनलपर्यंत पोहोचण्याचे किती चान्सेस आहे, जाणून घेऊयात सेमी फायनलच्या या संपुर्ण गणितातून.
हे ही वाचा : टीम इंडियाच्या पराभवासाठी पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात,झिंबाब्वेला दिली खुली ऑफऱ
T20 वर्ल्ड कपच्या (T20 world cup) सुपर-12 मध्ये फक्त 6 सामने बाकी आहेत, मात्र आतापर्यंत एकही संघ सेमी फायनल (Semi final) फेरीत पोहोचलेला नाही. सात संघामध्ये टॉप 4 मध्ये दाखल होण्याची शर्यंत सुरु आहे. त्यामुळे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये कोणत्या संघाना सेमी फायनल गाठण्याची संधी आहे, हे जाणून घेऊयात.
ग्रुप-1 मधील आयर्लंडविरुद्धचा सामना न्यूझीलंडने जिंकल्यास उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. जर न्यूझीलंड हा सामना हरला तर प्रकरण अधिक रंजक होईल.अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) आपले सामने जिंकून उपांत्य फेरीत जाऊ शकतात.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या तिघांनीही आपापले सामने जिंकले, तर इंग्लंड न्यूझीलंडसह उपांत्य फेरीत जाईल, कारण त्यांचा नेट रन रेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला आहे. ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड यापैकी एकाने आपला सामना गमावला आणि श्रीलंकेने इंग्लंडला हरवले तर श्रीलंका उपांत्य फेरीत पोहोचेल.
पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव झाल्यानंतर गट 2 मधील लढत रंजक बनली आहे. झिम्बाब्वेला हरवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करणे भारतासाठी सोपे असेल.भारताने हा सामना गमावला तरी पराभवाचे अंतर कमी ठेवण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागेल.
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव टाळावा लागणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तरी दक्षिण आफ्रिकेसाठी अवघड जाणार नाही. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामना गमावला तरच पाकिस्तानला संधी निर्माण होईल. भारताचा पराभव झाला असला तरी रनरेटमुळे पाकिस्तानला त्यांना मागे टाकणे कठीण होणार आहे.
दरम्यान आता येत्या काही सामन्यात सेमी फायनलचं (Semi final) गणित सुटणार आहे. क्रिकेट फॅन्सचे याकडे लक्ष लागले आहे.