IPL दरम्यान हा धडाकेबाज खेळाडू घेणार संन्यास?

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला पण नशीब खराब... IPL दरम्यान संन्यास घेण्याच्या तयारीत

Updated: Apr 6, 2022, 03:43 PM IST
IPL दरम्यान हा धडाकेबाज खेळाडू घेणार संन्यास? title=

मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. या लीगमध्ये पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतं. आयपीएलमधून अनेक युवा खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडतात. तर अनेकांचं करिअर होतं मात्र एक खेळाडू संन्यास घेण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियामधून बाहेर गेलेला खेळाडूला आयपीएलमध्येही संधी मिळाली नाही. त्यामुळे तो संन्यास घेण्याच्या तयारीत आहे. 

केदार जाधव 2010 मध्ये आयपीएलचा भाग होते. त्याची आयपीएलमधील कामगिरी फार चांगली नव्हती. 2018 आणि 2020 मध्ये केदार जाधव चेन्नईमधून खेळत होता. 2021 मध्ये हैदराबादने त्याला खेळण्याची संधी दिली. 

केदार जाधवने 6 सामन्यात 55 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 93 सामन्यात 1196 धावा केल्या आहेत. त्याची कामगिरी विशेष न राहिल्याने तो कुठेच जास्तवेळ टिकू शकला नाही. टीम इंडियामधूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

टीम इंडियासाठी तो खूप मोठी अडचण होता. त्याला दूधातून माशीला काढावं तसं टीममधून बाहेर काढण्यात आलं. केदार जाधव 37 वर्षांच्या आहे. वाढणारं वय आणि त्याची एकूण कामगिरी पाहता त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळेल याची आशा मावळत आहे. 

2019 मध्ये केदार जाधव वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. मात्र तिथेही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. केदार जाधवने 73 वन डे सामने खेळले यामध्ये 1389 धावा केल्या. 9 टी 20 सामने खेळून 122 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये केदार जाधव लवकरच संन्यास घेऊ शकतो.