T20 World Cup 2022 : टीम इंडियात टी 20 वर्ल्ड कपसाठी या स्टार खेळाडूची एन्ट्री होणार?

आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधीपर्यंत सर्व संघ त्यांच्या मुख्य संघात राखीव खेळाडूंसह बदलू शकतात.

Updated: Sep 17, 2022, 10:30 PM IST
 T20 World Cup 2022 : टीम इंडियात टी 20 वर्ल्ड कपसाठी या स्टार खेळाडूची एन्ट्री होणार? title=

T20 World Cup Indian Team : अवघ्या काही दिवसांवर टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) येऊन ठेपला आहे. टीम इंडियाला याआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. टी-20 वर्ल्ड कपच्यादृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या दोन्ही मालिकेनंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होऊ शकतात. टीम इंडियामध्ये खेळाडूला संधी मिळू शकते. (team india faster bowler mohammed shami may give chance in main squad for t 20 world cup 2022 know icc rule)

या खेळाडूला मिळणार संधी? 

टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमीला टी-20 वर्ल्ड कपसाठीच्य सॅक्वडमध्ये संधी मिळाली नाही. शमीचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. शमीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यास त्याला मुख्य संघात स्थान मिळू शकते. शमी डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करतो. कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. मोहम्मद शमीने भारताकडून 17 टी-20 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधीपर्यंत सर्व संघ त्यांच्या मुख्य संघात राखीव खेळाडूंसह बदलू शकतात. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका मोहम्मद शमीच्या कारकिर्दीसाठी निर्णायक ठरू शकते.

वर्ल्ड कपसाठी या गोलंदाजांना संधी

टीम इंडियात निवड समितीने टी 20 वर्ल्ड कपसाठी 4 गोलंदाजांना संधी दिली. त्यात जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांना संधी देण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा पाचव्या वेगवान गोलंदाजासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याचा वापर करू शकतो. आशिया कपमध्ये मोहम्मद शमीला वगळल्याने सिलेक्टर्सना टीकेला सामोरे जावे लागले होतं.