लग्न होताच अरुण लालचा किस करतानचा फोटो व्हायरल

टीम इंडियाचे (Team India) माजी क्रिकेटपटू अरुण लाल (Arun Lal)  वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत.

Updated: May 2, 2022, 07:43 PM IST
लग्न होताच अरुण लालचा किस करतानचा फोटो व्हायरल title=

मुंबई :  टीम इंडियाचे (Team India) माजी क्रिकेटपटू अरुण लाल (Arun Lal) वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. लाल यांनी 38 वर्षीय बुलबुल साहासोबत सप्तपदी घेतल्या. लाल यांनी कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये हे लग्न केलं. या दोघांमध्ये 28 वर्षांचा फरक आहे, जो सध्या चर्चेचा विषय आहे. (team india former cricketer arun lal 2 marriage with bulbul saha photo viral on social media)

दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अरुण आणि बुलबुल यांचा महिनाभरापूर्वीच साखरपुडा झाला होता. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते.  लाल आणि बुलबुल साहा यांचे लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतरचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये लाल यांनी बुलबुलला किस केलंय. 

लाल यांनी यापूर्वी रीनाशी लग्न केले होते. रीनाने त्याला दुसऱ्या लग्नासाठी संमती दिली होती, त्यानंतर दोघांनी लग्न केले. रीना बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे ती खूप खूश आहे.

लाल यांचा जन्म 1955 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. अरुणने कॉमेंट्रीमध्येही भाग्य आजमावलं. मात्र 2016 मध्ये कॅन्सरचं निदान झाले. त्यामुळे लाल यांनी कॉमेंट्री सोडली. लाल बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही राहिले आहेत.

लाल यांनी 1982 ते 89 दरम्यान एकूण 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. लाल यांनी यादरम्यान कसोटीत 729 आणि वनडेमध्ये 122 धावा केल्या. लाल यांनी टेस्टमध्ये 6 आणि वनडेत 1 अर्धशतक झळकवलं.