Shikhar Dhawan: 'तू जो मिला...' मुलगा जोरावरला भेटून शिखर धवन भावूक, Video व्हायरल

Shikhar Dhavan आणि Ayesha Mukherjee विभक्त झाले असून त्यांचा मुलगा आपल्या आईबरोबर ऑस्ट्रेलियाला रहातो, नुकताच शिखर धवन आपल्या मुलाला भेटला  

Updated: Nov 19, 2022, 07:59 PM IST
Shikhar Dhawan: 'तू जो मिला...' मुलगा जोरावरला भेटून शिखर धवन भावूक, Video व्हायरल title=

Shikhar Dhawan : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhavan) यांने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केल आहे. शिखर धवन आपला मुलगा जोरावरला (Zoravar) भेटतानाच हा व्हिडिओ आहे. मुलाला पहाताच शिखर धवन भावूक झालेला या व्हिडिओत दिसतंय. टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (New Zealand Tour) आहे आणि शिखर धवन एकदिवसीय संघाची धूरा सांभाळणार आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची एकदिवसीय मालिका (India vs New Zealand ODI Series) 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

शिखर-जोरावर भेटीचा व्हिडिओ व्हायरल
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्याआधी शिखर धवन ऑस्ट्रेलियात पोहोचला. तिथे त्याने आपला मुलगा जोरावर यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. शिखर धवन याने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आपल्या मुलाला भेटल्यावर शिखर भावूक झाला, त्याने जोरावरला प्रेमाने उचलूनही घेतलं. या व्हिडिओला त्याने 'तू जो मिला' हे गाणं लावलं आहे. 

जोरावर आईबरोबर ऑस्ट्रेलियात
शिखर धवनचा मुलगा जोरावर आपली आई आयशाबरोबर (Ayesha Mukherjee) ऑस्ट्रेलियात (Australia) रहातो. शिखर धवन आणि आयशा एकत्र रहात नाहीत. काही महिन्यांपूर्वी आपण विभक्त होत असल्याची घोषणा या दोघांनी केली होती. त्यानंतर मुलगा जोरावर आई आयशाबरोबर ऑस्ट्रेलियात रहातो.

शिखर धवनकडे एकदिवसीय कर्णधारपद
टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी अनेक सीनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर शिखर धवन एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. 

सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर अनेकवेळा शिखर धवनकडे एकदिवसीय संघाची जबाबदारी देण्यात येते. आयपीएल 2023 साठी पंजाब किंग्सचं कर्णधारपदीही शिखर धवनची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : T20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर Rohit Sharma ला हटवणार? आता नव्या मिशनची तयारी?

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका
- पहिला एकदिवसीय सामना : 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7 वाजता (ऑकलँड)
- दूसरा एकदिवसीय सामना : 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7 वाजता (हॅमिल्टन)
- तिसरा एकदिवसीय सामना : 30 नोव्हेंबर 2022, सकाळी 7 वाजता (क्राइस्टचर्च)