खेळाडू कमी, सपोर्ट स्टाफच जास्त; टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया रवाना झाली खरी पण...!

पण या फोटोमध्ये चाहत्यांना काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं.

Updated: Oct 7, 2022, 12:13 PM IST
खेळाडू कमी, सपोर्ट स्टाफच जास्त; टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया रवाना झाली खरी पण...! title=

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप 2022 खेळायचा आहे. दरम्यान यापूर्वी टीमला 4 सराव सामनेही खेळायचे आहेत. बीसीसीआयने यापूर्वी टीम इंडियाचा एक फोटोही शेअर केला. यामध्ये सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचारी एकमद सूटा-बूटात दिसतायत. बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, 'परफेक्ट पिक्टर. T20 क्रिकेट वर्ल्डकप आम्ही येतोय.

फोटोत काही गडबड?

पण या फोटोमध्ये चाहत्यांना काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक गोष्ट लक्षात आली की, त्यात खेळाडू कमी आणि कर्मचारी जास्त दिसताय. या फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्मासह केवळ 14 खेळाडू दिसत आहेत. तर प्रशिक्षक राहुल द्रविडसह 16 जण स्टाफमध्ये मेंबर्स आहेत.

यावेळी बीसीसीआयने टी-20 वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. तसंच चार खेळाडूंना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. मात्र यादरम्यान, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे.

चार स्टँडबाय खेळाडू कुठे आहेत?

यामुळेच फोटोमध्ये केवळ 14 खेळाडू दिसत असून हे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झालेत. बुमराहच्या बदलीची घोषणा अद्याप झालेली नाही. श्रेयस अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमी हे स्टँडबाय खेळाडू आहेत. यापैकी श्रेयस, रवी आणि दीपक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळतायत.

या वनडे मालिकेनंतरच तिन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. तर मोहम्मद शमी नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आता त्याची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी रिहॅबिलीटेशनसाठी तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) उपस्थित आहे. शमीही नंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

बुमराहच्या जागी कोण येणार?

BCCI 15 ऑक्टोबरला बुमराहच्या बदलीची घोषणा करू शकते. मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांच्याशिवाय मोहम्मद सिराजही या शर्यतीत कायम आहे. सिराज आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकाही खेळतोय.