India Tour of New Zealand Postponed | टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा स्थगित, नक्की कारण काय?

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा (India Tour of New Zealand Postponed) स्थगित करण्यात आला आहे.  

Updated: Sep 16, 2021, 04:35 PM IST
India Tour of New Zealand Postponed | टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा स्थगित, नक्की कारण काय? title=

वेलिंग्टन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना रद्द झाला. त्यानंतर आता टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा (Team India Tour New Zeland) स्थगित करण्यात आला आहे. टीम इंडियाला आगामी टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 2O World Cup 2021) नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जायचं होतं. टीम इंडिया या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी आणि टी 20 मालिका पार पडणार होती. या कसोटी मालिकेत 2 सामने खेळवण्यात येणार होते. हे दोन्ही सामन्यांचा समावेश हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) स्पर्धेत होता. न्यूझीलंड क्रिकेटचे प्रवक्ता यांनी stuff.co.nz या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार दौरा स्थगित झाल्याची माहिती दिली. मात्र यानंतरही बीसीसीआय (BCCI) किंवा न्यूझीलंड (New Zeland) क्रिकेट बोर्डाकडून याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. (team India Tour of New Zealand is Postponed due to busy international schedule) 

नक्की कारण काय?

टीम इंडिया या मोसमात फ्यूचर टूर प्रोग्रॅमनुसार दौऱ्यावर येणार नाही, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेटचे प्रवक्ता यांनी stuff.co.nz च्या हवाल्याने दिली. त्यामुळे हा दौरा आता 2022 पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे ऑस्ट्रेलियात करण्यात आलंय. या स्पर्धेनंतर हा दौरा खेळवला जाऊ शकतो. 

न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे कठोर नियम आहेत. एकूणच किवी खेळाडू डिसेंबर महिन्याआधी न्यूझीलंडला पोहचू शकणार नाहीत. न्यूजीलंडला पोहचल्यानंतर किवी खेळाडूंना नियमांनुसार (Managed Isolation and Quarantine) 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. त्यानंतर खेळाडूंना आपल्या घरी परतता येईल. त्यामुळे याचा थेट परिणाम हा न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यावरही होऊ शकतो. त्यामुळे हा सामना 28 डिसेंबर किंवा त्यापुढेही ढकलला जाऊ शकतो.

एफटीपीनुसार, बांगलादेश न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात बांगलादेश न्यूझीलंड विरुद्ध 2 टेस्ट आणि 3 टी 20 मॅचेस खेळणार आहे. यानंतर यजमान संघाला नेदरलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. यानंतर पुढे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी आणि टी 20 मालिकाही खेळायची आहे.