Asian Games 2023 : भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आगामी एशियन गेम्समध्ये ( Asian Games 2023 ) टीम इंडिया ( Team India ) सहभागी होणार नाहीये. टीम इंडियाच्या चाहत्यांना फारच निराश करणारी ही बातमी आहे. भारतीय फुटबॉल टीम 2023 च्या आशियाई क्रीडा ( Asian Games 2023 ) स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सहभागी होणार नाहीये. ते खंडातील अव्वल आठ क्रमवारीत असण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या ( Sports Ministry ) निकषांची पूर्तता करत नाहीत.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने निर्णय घेतला होता की, राष्ट्रीय वरिष्ठ टीमचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक थायलंडमधील किंग्स कपनंतर चीनमध्ये होण्याऱ्या हांगझोऊमध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत अंडर-23 टीम टीम्सला नेण्यात येईल.
2002 सालापासून केवळ 23 वर्षांखालील खेळाडूंना आशियाई क्रीडा ( Asian Games 2023 ) फुटबॉल ( Football Team India ) स्पर्धेसाठी पाठवण्यात येतं. मात्र यामध्ये या वयाच्या अधिक असलेल्या 2 खेळाडूंच्या समावेशाची परवानगी असते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ (NSFs) यांना पाठवलेल्या पत्रात, क्रीडा मंत्रालयाने म्हटलंय की, "प्रत्येक सांघिक स्पर्धेसाठी, ज्या खेळांमध्ये टीमने गेल्या एका वर्षात आशियातील सहभागी देशांमध्ये अव्वल आठ स्थान मिळवलंय, अशा खेळांचाच आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी विचार केला जावा.
एशियाई रँकिंगमध्ये भारत पहिल्या आठच्या जवळपासही नाहीये. टीम इंडिया सध्या आशियाई फुटबॉल महासंघाच्या क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर आहे. दरम्यान याबाबत एआयएफएफच्या म्हणण्यानुसार, या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाला आवाहन करणार आहे.
एआयएफएफचे सरचिटणीस शाजी प्रभाकरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सरकारने घेतलेला निर्णय असून त्याचं पालन केलं पाहिजे. मात्र आम्ही सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन करणार आहोत.
फुटबॉल टीम इंडियाची यंदाची कामगिरी खूपच प्रेरणादायी आणि उत्तम आहे. एशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यास फुटबॉलसाठी, विशेषत: अंडर-23 फुटबॉलपटूंसाठी ही एक चांगली बाब असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.