बंगळुरु : दुसऱ्या इनिंगमध्ये अफगाणिस्तान 103 रनवर ऑलआऊट झाली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये अफगाणिस्तानकडून शहजादने 13, हश्मतअल्लाह 36 रन केले. भारताकडून उमेश यादवने 3, जडेजाने 4, इशांतने 2 विकेट घेतले. पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून धवनने 107 रन तर मुरली विजयने 105 रन केले. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 474 रन केले. अफगाणिस्तानने पहिल्या इनिंगमध्ये 109 आणि दुसऱ्य़ा इनिंगमध्ये 103 रन केले. भारताने या ऐतिहासिक सामन्यामध्ये एक इनिंग आणि 262 रनने विजय मिळवला आहे. भारताने 2 दिवसातच विजय मिळवला आहे.
पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने 8 ओव्हरमध्ये 27 रन देत 4 विकेट घेतले. ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजाने दोन-दोन विकेट घेतले. उमेश यादवने एक विकेट घेतला. अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक मोहम्मद नबीने 24 रन केले. त्यानंतर मुजीब उर रहमानने 15, मोहम्मद शहजाद आणि रहमत शाहने 14-14 रन केले. हशमतु्ल्लाह शाहिदी आणि कर्णधार असगर स्टानिकजाईने 11 रन केले.