'या' गोष्टीत शुभमन गिलला अजून किंग कोहली हरवू नाही करू शकला

शुभमन गिल या गोष्टीमध्ये कोहलीपेक्षा सरस आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

Updated: May 14, 2021, 10:17 AM IST
'या' गोष्टीत शुभमन गिलला अजून किंग कोहली हरवू नाही करू शकला

मुंबई: किंग विराट कोहली आपल्या फिटनेसच्या बाबतीत किती कमाल आहे सर्वांनाच माहिती आहे. फिटनेस असो किंवा मैदानातील खेळ विराट कोहली सगळीकडे एकदम परफेक्ट राहण्याचा कायमच प्रयत्न करतो. टीम इंडियातील खेळाडू कोहलीला कोणी हरवू शकत नाही असंही म्हटलं जातं. पण एक गोष्ट आहे जिथे विराट कोहलीला चक्क शुभमन गिल हरवतो. 

शुभमन गिल या गोष्टीमध्ये कोहलीपेक्षा सरस आहे असं म्हणायला काही हरकत नाही. शुभमनला ही गोष्ट विराट कोहलीला देखील शिकवायची आहे. अशी कोणती गोष्ट जी गिलला खूप चांगली जमते पण विराटला नाही?

शुभमन गिलनं यासंदर्भात एका मुलाखतीमध्ये खुलासा केला. व्हिडीओ गेममध्ये फिफा खेळताना विराट कोहली बऱ्याचदा पराभूत होतात. विराट कोहलीसोबत खेळताना शुभमन काय विजयी होतो. विराट कोहलीला व्हिडीओ गेम्स खेळायला खूप आवडतात. रिकामा वेळ मिळाला तर दोघंही व्हिडीओ गेम्स खेळणं पसंत करतात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शुभमन गिलनं खूप चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर मात्र त्याची कामगिरी टीम इंडियाकडून विशेष राहिलेली नाही. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात देखील गिल फ्लॉप ठरला होता. IPLच्या 7 सामन्यांमध्ये त्याने केवळ 132 धावा केल्या आहेत. 

इंग्लंड दौऱ्यासाठी पुन्हा एकदा शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आहे. तर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिज आहे. इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिलला आपली कामगिरी उत्तम दाखवण्याची संधी आहे.