कोहलीकडून मिळालेल्या गिफ्टला फ्रेम करणार, 'या' खेळाडूनं शेअर केला फोटो

RCB संघातील हा युवा खेळाडू विराट कोहलीकडून मिळालेलं हे खास गिफ्ट फ्रेम करून ठेवणार आहे.

Updated: May 14, 2021, 08:37 AM IST
कोहलीकडून मिळालेल्या गिफ्टला फ्रेम करणार, 'या' खेळाडूनं शेअर केला फोटो

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला भेटण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. यंदाच्या IPLमध्ये खेळणारा केरळरचा युवा फलंदाज जो विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे त्याला विराटच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या खेळाडूला विराट कोहलीनं खास गिफ्ट दिलं. हे गिफ्ट आपल्या घरी मी  फ्रेम करून लावणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

केरळचा युवा खेळाडू मोहम्मद अझरुद्दीनला विराट कोहलीनं ग्रीन जर्सीवर ऑटोग्राफ दिली आहे. या जर्सीचा फोटो मोहम्मद अझरुद्दीनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या हिरव्या रंगाच्या जर्सीवर विराटनं ऑटोग्राफ दिली आहे. या सुवर्ण क्षणांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये मी ही जर्सी फ्रेम करून ठेवणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohammed Azharuddeen (@azhar_junior_14)

या आधी राजस्थान आणि दिल्ली संघातील काही खेळाडूंनी विराट कोहलीची ऑटोग्राफ आपल्या जर्सीवर करून घेतली आहे. तर राहुल तेवतियाला विराट कोहलीनं आपली जर्सी भेट दिली होती. 

मोहम्मद अझरुद्दीननं सैय्यद मुश्ताक अली टी 20 टुर्नामेंटमध्ये दमदार कामगिरी केली होती. 37 बॉलमध्ये त्याने शतक ठोकलं होतं. यंदाच्या सैय्यद मुश्ताक अली स्पर्धात त्याने 214 धावा केल्या होत्या. अझरुद्दीनने आतापर्यंत 24 टी 20 सामन्यांमध्ये 451 धावा केल्या आहेत.

यंदाच्या IPLमध्ये रॉयल चॅलेंजर्स संघात त्याला 20 लाख रुपये देऊन समाविष्ट करण्यात आलं. अझरुद्दीनने केरळकडून खेळताना जबरदस्त कामगिरी दाखवली होती. त्यामुळे त्याला IPLमध्ये संधी देण्यात आली.