भारताच्या तेजिंदरपाल सिंगला गोळाफेकीत सुवर्णपदक

भारताचे या स्पर्धेतील अॅथलेटीक्समधील हे पहिलेच पदक ठरले आहे. 

Updated: Aug 25, 2018, 10:05 PM IST
भारताच्या तेजिंदरपाल सिंगला गोळाफेकीत सुवर्णपदक title=

जकार्ता: आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंगने भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने २०.७५ मीटरची विक्रमी फेक केली आणि भारताला आजच्या दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
 
त्याने या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला. पंजाबच्या या गोळाफेकपटूने शानदार कामगिरी करत भारताला सुवर्ण कामगिरी करुन दिली. भारताचे या स्पर्धेतील अॅथलेटीक्समधील हे पहिलेच पदक ठरले आहे. 

याव्यतिरीक्त अॅथलेटिक्समध्ये भारताच्या मोहम्मद अनसने ४०० मी. शर्यतीमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. याचसोबत बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे उरलेल्या दिवसाच्या खेळात भारताच्या खात्यात किती पदकांची भर पडतेय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.