दुबई : सध्याच्या घडीला क्रीडा जगतामध्ये पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमधील टी20 विश्वचषकातील उपांत्य सामना आणि यामध्ये पाकिस्तानच्या संघाचा झालला पराभव याचीच चर्चा सुरु आहे. संघावर क्रीडारसिकांनी तीव्र स्वरात नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व सुरु असतानाच आता भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक याच्या नावानं भलत्याच चर्चा सुरु झाल्या.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सानिया मिर्झा हिनं आता आपल्या पतीविरोधात थेट तक्रारच केली आहे. अगदी जाहीर पद्धतीनं सानियानं ही तक्रार केल्यामुळं सर्वांच्याच नजरा वळल्या आहेत. (T20 WORLD CUP PAK VS AUS)
पाकिस्तानचा संघ पराभूत झाल्याचं चाहते पचवत असतानाच आता हे नवं काय? असाच प्रश्न तुम्हाला पडला ना?
तर, सानियानं कोणत्याही गंभीर स्वरुपाची तक्रार केली नसून, तिची ही तक्रार आहे एका मस्करीचा भाग. इन्स्टाग्राम रील्सची मजा सानियानंही घेतली आहे. ज्यामध्येत ती विनोदी अंदाजात आपल्या पतीला म्हणजेच शोएब मलिकला तिची किंमतच नसल्याचं म्हणताना दिसत आहे.
'बेटा हमेशा उन लोगों से दूर रहो जिसको तुम्हारी कदर ना हो', असं ती या रीलमध्ये अभिनय करताना दिसते. यानंतर तीच पुढे 'उन्हीं के घर में रहती हूँ', अशा शब्दांत या प्रश्नाचं उत्तर देताना दिसते.
सानिया हे सर्व बोलत असतानाच बेडवर एका बाजूला शोएबही बसला असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं. हा विनोदी रील शेअर करत सानियानं त्याला 'घर की मुर्गी' असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, एकिकडे पाक संघाच्या पराभवाची चर्चा असतानाच हा रीलही बराच गाजताना दिसतोय, असं म्हणायला हरकत नाही.