मुंबई : बडोद्याविरुद्ध मुंबईची टीम गुरुवारी ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. या मॅचपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंचा गौरव करणार आहे. ४१ वेळा रणजी जिंकणाऱ्या मुंबईच्या टीमचा रणजी क्रिकेटमध्ये दबदबा आहे.
हा सामना उद्या ९ नोव्हेंबरपासून ते १२ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. या सामन्याला सकाळी ९.३० वाजता सुरु होणार आहे. सध्या रणजी चषक स्पर्धा सुरु आहे. दरम्यान, पहिल्या असमान्य कामगिरीने या कॅप्टन्सनी मुंबईला स्थानिक क्रिकेटमध्ये वर्चस्व मिळवून दिलं. विजय मर्चंट, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणेसारखे आतंराष्ट्रीय क्रिकेटपटू मुंबईनं भारतीय टीमला दिलेत. या आदींचा सामना करण्यात येणार आहे.
रणजीच्या ८३ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी टीम कुठली असेल तर ती म्हणजे मुंबईच. मुंबईची टीम बदलत गेली. नेतृत्व बदलले. मात्र, रणजी ट्रॉफी मुंबईकडे कशी राहिल हा एकमेव ध्यास या टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचा. त्यामुळेच खडूस मुंबईकर अशीच काहीशी या टीमची भारतीय क्रिकेटमध्ये ओळख. हा खडूसपणा मुंबईच्या प्रत्येक क्रिकेटपटूच्या नसानसात भिणलेला. कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे मुंबईच्या टीमचा रणजी क्रिकेटमध्ये कायमचं दबदबा पाहिला मिळतो.
१९३४ मध्ये रणजी क्रिकेटला सुरुवात झाली. आणि मग सुरु झाला भारतीय क्रिकेटमधील मुंबईच्या टीमचा सोनेरी प्रवास. मुंबईनं विक्रमी ४६ वेळा रणजी फायनलमध्ये प्रवेश केलाय. यात 41 वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरण्यास त्यांना यश आलंय. १९५५-५६ ते १९७६-७७ मध्ये मुंबईचं सर्वाधिक वर्चस्व या टुर्नामेंटमध्ये दिसून आलं.
मुंबईनं याचदरम्यान २२ पैकी २० वेळा अजिंक्यपद पटकावलं. तर सलग १५ वेळा रणजी ट्रॉफी जिंकण्याची किमयाही केली. या टुर्नामेंटमधील सर्वाधिक रन्स या मुंबईकर वासिम जाफरच्या नावावरच आहे. १०१४३ रन्स त्याच्या नावावर आहेत. तर सर्वाधिक सेंच्युरीजही वासिम जाफरनचं केल्यात.