मुंबई: रशियात सुरू असलेल्या फीफा विश्वचषक स्पर्धेत होत असलेल्या रोमहर्षक लढती पाहून फुटबॉलप्रेमिंच्या आनंदाला उधान आले आहे. प्रत्येक फुटबॉलप्रेमी आपल्या आवडत्या संघाबाबत किंवा फुटबॉलपटूला यश मिळावे यासाठी शुभेच्छा देत आहे. प्रार्थना करत आहे. जगभरातील स्थानिक ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमेही या क्षणांना तोंडभरून प्रसिद्धी देत आहेत. त्यामुळे एकुणच काय तर, जगभरात फुटबॉलचे वारे जोरात वाहात आहे. संघातील प्रत्येक खेळाडू विजयासाठी जीव तोडून मेहनत करताना दिसत आहे. पण, म्हणून काही सर्वच खेळाडू लोकप्रिय असतात आणि त्यांची कमाईही तितकीच गलेलठ्ठ असते असे मुळीच नाही. प्रचंड लोकप्रियता आणि तितकीच कमाई हे काही खेळाडूंच्याच बाबतीत घडते. अर्थात त्यामागे त्यांचे कष्टही तितकेच असते हा भाग वेगळा. म्हणूनच जाणून घेऊया सर्वाधिक मानधन घेणारे जगप्रसिद्ध असलेले टॉप 7 फुटबॉलपटू
एकूण कमाई - ८४ मिलियन डॉलर
क्लब - बार्सिलोना
राष्ट्रीय संघ - अर्जेंटीना
संघातील स्थान - फॉर्वर्ड (Forward)
वय - ३० वर्षे
एकूण कमाई - ७३ मिलियन डॉलर
क्लब - पॅरिस सेंट जर्मन (Paris Saint-Germain)
राष्ट्रीय संघ - ब्राझील
संघातील स्थान - फॉर्वर्ड (Forward)
वय - २६ वर्षे
एकूण कमाई - ६१ मिलियन डॉलर
क्लब - रिअल माद्रिद
राष्ट्रीय संघ - पोर्तुगाल
संघातील स्थान - फॉर्वर्ड (Forward)
वय - ३३ वर्षे
एकूण कमाई - २८.६ मिलियन डॉलर
क्लब - रिअल माद्रिद
राष्ट्रीय संघ - वेल्स
संघातील स्थान - फॉर्वर्ड (Forward)
वय - २८ वर्षे
एकूण कमाई - २६.८ मिलियन डॉलर
क्लब - हेबेई चायना फोर्च्यून (Hebei China Fortune)
राष्ट्रीय संघ - अर्जेंटीना
संघातील स्थान - फॉर्वर्ड (Forward)
वय - ३३ वर्षे
एकूण कमाई - २५.९ मिलियन डॉलर
क्लब - शांघाय एसआयपीजी
राष्ट्रीय संघ - ब्राझील
संघातील स्थान - मिडफिल्डर
वय - २६ वर्षे
एकूण कमाई - २५ मिलियन डॉलर
क्लब - मँचेस्टर युनायटेड
राष्ट्रीय संघ - फ्रेंच
संघातील स्थान - मिडफिल्डर
वय - मिडफिल्डर