IND vs AUS: आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वीच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 5 सामन्यांच्या या सिरीजमध्ये 3 सामने झाले आहेत. यामध्ये पहिले 2 सामने टीम इंडियाने जिंकले असून तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. अशातच सिरीजमध्ये 2-1 ने पिछाडीवर असताना ऑस्ट्रेलियाच्या टीमने चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यासाठी टीममध्ये मोठे बदल केले आहेत.
5 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमने मोठे बदल केले आहेत. यावेळी टीममधून 6 खेळाडूंना वगळण्यात आलंय. हे ते खेळाडू आहेत ज्यांचा वर्ल्डकरच्या टीममध्ये समावेश करण्यात आला होता. या खेळाडूंमध्ये स्टीव्ह स्मिथ, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि अॅडम झाम्पा यांचा समावेश आहे. दरम्यान हे सर्व खेळाडू मायदेशी परतले आहेत.
ऑस्ट्रेलियाने गेल्या दोन टी-20 सामन्यांसाठी सहा बड्या खेळाडूंना विश्रांती देऊन मायदेशी पाठवलंय. मात्र गेल्या सहा महिन्यांत भारताला सर्वाधिक त्रास देणाऱ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमने त्यांचा ओपनर ट्रॅव्हिस हेडला टीममध्ये कायम ठेवलंय. यावेळी पहिल्या 2 T20 मध्ये हेडला विश्रांती देण्यात आली होती.
मात्र आता 6 खेळाडू मायदेशी परतल्याने हेडला टीममध्ये संधी देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या आणि पाचव्या टी-20मध्ये सिरीज जिंकण्यासाठी हेड महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.