बेंचवरचा खेळाडू 'हा' IPL चॅम्पियन; कठोर परिश्रमानंतरही कोहली अपयशी!

कोहली खेळाडू म्हणून किंवा कर्णधार म्हणून आयपीएलचा चॅम्पियन बनू शकलेला नाही.

Updated: Oct 17, 2021, 07:03 AM IST
बेंचवरचा खेळाडू 'हा' IPL चॅम्पियन; कठोर परिश्रमानंतरही कोहली अपयशी!

दुबई : विराट कोहलीने क्रिकेट जगतात अनेक विक्रम केले आहेत. परंतु तो खेळाडू म्हणून किंवा कर्णधार म्हणून आयपीएलचा चॅम्पियन बनू शकलेला नाही. ही एकमेव गोष्ट आहे ज्याने किंग कोहलीला नक्कीच खटकत असेल. 

अजूनही कोहलीच्या हाती IPL ट्रॉफी नाही

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्याने स्पर्धेच्या 207 सामन्यांमध्ये 37.39 च्या सरासरीने आणि 129.94 च्या स्ट्राईक रेटने 6283 धावा केल्या आहेत. पण आयपीएलच्या ट्रॉफीवर अजून त्याने नाव कोरलेलं नाही.

आयपीएल चॅम्पियन खेळाडूंच्या यादीत पुजारा

टीम इंडियाचा असा एक स्टार खेळाडू आहे ज्याने या वर्षी एकही आयपीएल सामना खेळला नाही. पण स्पर्धेचा चॅम्पियन खेळाडू म्हणून त्याचं नाव कायमचं जोडलं गेलं आहे. सीएसकेचा खेळाडू चेतेश्वर पुजाराने देखील ट्रॉफी जिंकली. त्यामुळे ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत चेतेश्वर पुजारा अधिक लकी आहे.

पुजारा बेंचवर बसून झाला चॅम्पियन

चेतेश्वर पुजाराचा यावर्षी आयपीएलच्या लिलावात एमएस धोनीच्या टीम चेन्नई सुपर किंग्जमध्ये समावेश करण्यात आला होता, तो संपूर्ण हंगामाच्या सामन्यात बेंचवर बसला होता. सीएसकेने आयपीएलची फायनल जिंकल्याने त्याने ट्रॉफीही जिंकली.