अंडरटेकरच्या मोठ्या भावाचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

३ दशकं अंडरटेकरने रेसलिंग क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवलं.   

Updated: Jun 23, 2020, 01:27 PM IST
अंडरटेकरच्या मोठ्या भावाचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं  निधन title=

मुंबई :   WWE विश्वात प्रसिद्ध असलेल्या अंडरटेकरच्या मोठ्या भावाचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं  निधन झालं आहे. त्यामुळे अंडरटेकरला मोठा धक्का बसला आहे. टिमॉथी असं त्याच्या मोठ्या भावाचं नाव आहे. त्याचा मोठा भाऊ ६३ वर्षांचा होता. अंडरटेकरने WWE मधून कायमस्वरुपी निवृत्ती घेतली आहे. दरम्यान Last Ride seriesच्या सामन्याच्या चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी त्याला त्याच्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी कळाली. बोनयार्ड येथे सामन्याच्या चित्रीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा अंडरटेकरच्या भाचीने फोन करून आपल्या वडिलांची बातमी अंडरटेकरला दिली. 

याविषयी बोलताना अंडरटेकरने  सांगितले की, 'अखेरच्या सामन्याच्या चित्रीकरणाला जात असताना  मला भाचीचा फोन आला. तेव्हा माझ्या भावाला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे तिने सांगितले. तेव्हा तो कोणत्या रुग्णालयात आहे असं मी तिला विचारलं पण तिने त्यांचे निधन झाल्याचे मला सांगितले.'  भावाच्या निधनामुळे अंडरटेकरला मोठा धक्का बसला आहे. 

शिवाय WrestleMania 36 या सामान्याचे चित्रीकरण संपल्यानंतर अंडरटेकरने त्याच्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी त्याच्या इतर भावांना आणि आईला दिली. भावाच्या जाण्याने त्याच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. 

दरम्यान, ३ दशकं रेसलिंग क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या अंडरटेरने आपल्या निवृत्तीची घोषणा करताच सोशल मीडियावर #ThankyouTaker ट्रेंड होत आहे. खुद्द अंडरटेकरने त्याच्या निवृत्तीची बातमी दिली. १९९० च्या दशकात अंडरटेकरने WWEमध्ये पदार्पण केले होते. 

वाढत्या वयामुळे तो आता फायटिंग करू शकत नाही. त्याची ताकत देखील कमी झाली आहे. तो आता ५५ वर्षांचा आहे. अंडरटेकरचं खरं नाव मार्क कॅलवे आहे. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये त्याने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’चं शिक्षण घेतलं.