Rohit Sharma: अगोदरच दोन भोपळे नावे आहेत, त्यात तू...; भर मैदानात अंपायरला असं का म्हणाला रोहित?

Rohit Sharma Viral Video: या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रोहितने उत्तम अर्धशतक झळकावलं. मात्र यावेळी अंपायरच्या एका निर्णयावरून रोहित काहीसा नाराज असल्याचं दिसून आलं. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 18, 2024, 07:38 AM IST
Rohit Sharma: अगोदरच दोन भोपळे नावे आहेत, त्यात तू...; भर मैदानात अंपायरला असं का म्हणाला रोहित? title=

Rohit Sharma Viral Video: बुधवारी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये तिसरा टी-20 सामना खेळवण्यात आला. बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात अखेरीस टीम इंडियाचा विजय झाला. हा पहिलाच असा आंतरराष्ट्रीय सामना होता ज्यामध्ये दोन वेळा सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रोहितने उत्तम अर्धशतक झळकावलं. मात्र यावेळी अंपायरच्या एका निर्णयावरून रोहित काहीसा नाराज असल्याचं दिसून आलं. 

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ तिसऱ्या टी-20 सामन्यातील आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अंपायर विरेंद्र शर्माला काहीतरी सांगताना दिसतोय. रोहित म्हणतोय की, वीरू... तिसरा बॉल स्पष्टपणे माझ्या बॅटला लागला होता, तुम्ही पॅडला लागल्याचा करार का दिला? एकतर पहिल्यांदाच मी 2 वेळा शून्यावर बाद झालो आहे. ( वीरू, थायपॅड पर दिया था क्या पहला बॉल? इतना बडा बॅट लगा था भाई, एक तो पहले ही दो झिरो पर हूं बे.  )

नेमकं काय घडलं?

अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माला एकही रन करता आला नव्हता. यावेळी तिसऱ्या सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर रोहित स्ट्राईकवर होता. यावेळी बॉल रोहितने लेग साईडला फ्लिक केला, हा बॉल फाईन लेगला बाऊंड्रीपार केला. मात्र अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी लेग बाय करार दिला. त्यामुळे हे चार रन भारताच्या खात्यात जमा झाले. फोर मारूनही रोहितच्या खात्यात शून्यच होता. पुढच्या दोन बॉलवर रोहितला एकही रन घेता आला नाही. पाचव्या बॉलवर रोहितने एक फटका लगावला, परंतु, बॉल त्याच्या थायपॅडला लागून बाऊंड्रीपार गेला. तर अखेरच्या बॉलवरही रोहितला रन घेता आला नाही. त्यामुळे पाच बॉल खेळूनही रोहितचं खातं उघडलं नव्हतं. 

दरम्यान याचनंतरचा हा व्हिडीओ असून चाहत्यांना मात्र हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. चाहत्यांनी यावर विविध कमेंट्स देखील केल्या आहेत.

रोहित शर्माचं 14 महिन्यांनंतर शतक

या सामन्यात एकेकाळी टीम इंडियाची फार बिकट परिस्थिती होती. भारताने 22 रन्सवर 4 विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जयस्वाल 4 रन, विराट कोहली आणि संजू शून्य तर शिवम दुबे एका रनवर माघारी परतले होते. यानंतर रोहित शर्माने टीमचा डाव सावरला आणि शानदार शतकंही ठोकलं. रोहितने रिंकू सिंगच्या साथीने डावाची सुत्रं हाती घेत 5व्या विकेटसाठी 190 रन्सची पार्टनरशिप केली. यादरम्यान रोहित शर्माने इतिहास रचला असून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतकं झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.