मुंबई : आयपीएलमधील तरुण खेळाडू असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा खेळाडू असो, प्रत्येकजण चांगली कामगिरी करून नाव कमावण्यासाठी धडपडत असतो. आयपीएलने जगातील अनेक संघांना विविध महान खेळाडू दिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अनेक सर्वोत्तम खेळाडूही यात खेळतात. पण असे 3 खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये खेळले नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या देशासाठी चांगली कामगिरी केली आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा सर्वोत्तम फलंदाज जो रूट आजपर्यंत आयपीएलचा एकदाही भाग झाला नाही. जो रूट इंग्लंडसाठी टी-20 क्रिकेट खेळत आहे, परंतु आजपर्यंत त्याने आयपीएलमध्ये भाग घेतला नाही. जो रूट व्यतिरिक्त, विराट कोहली, केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ, ज्यांनी जगभरात आपली फलंदाजी केलीये ते आयपीएलमध्ये खेळतात. जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 फलंदाज आहे.
इंग्लंडच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणडे स्टुअर्ट ब्रॉड. मात्र ब्रॉड देखील आजपर्यंत आयपीएलमध्ये सामील झालेला नाही. इंग्लंडकडून टी-20 मध्ये खेळताना ब्रॉडने 56 सामन्यांत 65 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र ब्रॉड गेल्या 6 वर्षांपासून टी -20 च्या बाहेर आहे.
बांगलादेश क्रिकेट संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक तमिम इक्बाल आजपर्यंत आयपीएल खेळला नाही. तमीमने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये बांगलादेशसाठी शतक झळकावलं आहे. देशासाठी खेळताना इक्बालच्या तीनही फॉरमॅटमध्ये 14000 पेक्षा जास्त धावा आहेत आणि जेव्हा टी -20 चा विचार केला जातो तेव्हा त्याने 1700 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.