T20 World Cup 2021 मध्ये भारतासाठी हे 3 खेळाडू ठरणार गेम चेंजर

टीम इंडिया यंदा विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष टीम इंडियाकडे लागून आहे.

Updated: Oct 21, 2021, 06:08 PM IST
T20 World Cup 2021 मध्ये भारतासाठी हे 3 खेळाडू ठरणार गेम चेंजर

यूएई : टी-20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) सुरू झालाय. ज्यामध्ये भारताचा 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. भारताने नेहमीच उत्कृष्ट खेळाडू निर्माण केले आहेत. हे खेळाडू पाकिस्तानविरुद्ध विजयाची पायाभरणी करतील. आम्ही ज्या खेळाडूंबद्दल बोलणार आहोत. ते उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. (Ind va Pak) पाकिस्तानविरुद्धच्या विजयात ते महत्त्वाची भूमिका बजावतील. चला जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल.

सर्वोत्तम टी-20 फलंदाज

केएल राहुल (KL Rahul)

केएल राहुल हा एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे. राहुलने टी -20 फॉरमॅटमध्ये 2 शतके देखील केली आहेत. तो टी-20 फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक खेळाडूंपैकी एक मानला जातो. वकेएल राहुल हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. तो खूप आक्रमकपणे खेळतो. जेव्हा तो त्याच्या लयमध्ये येतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजाची गय करत नाही. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याने आयपीएलच्या 13 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 626 धावा केल्यात. 
 
वरुण चक्रवर्ती (Varun Chakroborty)

वरुण चक्रवर्तीने आयपीएलमध्ये आपली ताकद सिद्ध केली. वरुणने 2021 च्या आयपीएलमध्ये फलंदाजांना जोरदार संघर्ष करायला लावला. तो एक रहस्यमय फिरकीपटू म्हणून उदयास आला आहे, ज्याचा चेंडू कोणत्याही फलंदाजाला लवकर समजत नाही. या लेग स्पिनरने 17 सामन्यांमध्ये केकेआर संघासाठी 18 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. तो अत्यंत चांगल गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने 6.40 च्या उत्कृष्ट सरासरीने गोलंदाजी केली. हा गोलंदाज पाकिस्तानसाठी खूप धोकादायक ठरू शकतो. वरुणच्या पाकिस्तानविरुद्ध गुगलीचे रहस्य आपल्याला पाहायला मिळेल.

रवींद्र जडेजा (Ravindra jadeja)

आयपीएल 2021 मध्ये जडेजाने 16 सामन्यात 13 विकेट घेतल्या आणि CSK साठी 227 उपयुक्त धावा केल्या. त्याने डेथ ओव्हर्समध्ये अत्यंत धोकादायक फलंदाजी करत गोलंदाजांना चांगलंच धुतलं. तो किती धोकादायक आहे, याचा अंदाज यावरून घेता येतो की त्याने हर्षल पटेलच्या एका ओव्हरमध्ये 37 धावा केल्या. जडेजा फिरकी खेळपट्ट्यांवर खूप चांगली गोलंदाजी करतो. जेव्हा त्याच्या लेग स्पिनची जादू काम करते, तेव्हा सर्वात मोठा फलंदाज त्याला खेळण्याचे धाडस करु शकत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या विजयात तो महत्त्वाचा दुवा ठरू शकतो.

रवींद्र जडेजाने गेल्या काही वर्षांत टीम इंडियामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने आपल्या गोलंदाजीनेच नव्हे तर फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केले. जडेजाची गणना जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. तो चेंडू स्टंपवर अशा प्रकारे मारतो की जणू नेमबाज जसा लक्ष्य साधतो.