हा फलंदाज करणार पाचही एकदिवसीय सामन्यांची ओपनिंग

नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत रोहितने शिखर धवनसोबत प्रत्येक इंनिगमध्ये ओपनिंग केली होती म्हणून रोहितला आराम दिला आहे. त्यामुळे रहाणे आजपासून विंडिजमध्ये होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांची ओपनिंग शिखर धवनसोबत करणार आहे असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

Updated: Jun 23, 2017, 02:30 PM IST
हा फलंदाज करणार पाचही एकदिवसीय सामन्यांची ओपनिंग title=

पोर्ट ऑफ स्पेन : नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत रोहितने शिखर धवनसोबत प्रत्येक इंनिगमध्ये ओपनिंग केली होती म्हणून रोहितला आराम दिला आहे. त्यामुळे रहाणे आजपासून विंडिजमध्ये होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांची ओपनिंग शिखर धवनसोबत करणार आहे असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

जेव्हा विराट कोहलीला हा प्रश्न विचारला तेव्हा कोहलीने सांगितले की, अजिंक्य रहाणे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमच्या संघाचा बॅक-अप ओपनर होता. निश्चितच रहाणे वेस्ट इंडिज मालिकेत शिखर धवनसह ओपनिंग करेल.

विराट कोहलीच्या या निर्णयामूळे ऋषभ पंतला मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.