ट्राय सीरिजमधून हार्दिक पांड्या आऊट ‘हा’ खेळाडू इन

६ मार्चपासून सुरू होत असलेल्या श्रीलंकेतील टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकर याचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 1, 2018, 07:21 PM IST
ट्राय सीरिजमधून हार्दिक पांड्या आऊट ‘हा’ खेळाडू इन title=

नवी दिल्ली : ६ मार्चपासून सुरू होत असलेल्या श्रीलंकेतील टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकर याचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे.

या सीरिजमध्ये टीम इंडिया आणि श्रीलंकेसोबत बांगलादेश सुद्धा आहे. ओपनिंग सामना टीम इंडिया-श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. 

हार्दिक पांड्या आऊट विजय इन

विजय शंकर याला याआधी २०१७ मध्ये भारतीय टेस्ट टीममध्ये संधी मिळाली होती. पण तो खेळणा-या अकरा खेळाडूंमध्ये जागा मिळवू शकला नव्हता. पण आता तो हार्दिक पांड्याची जागा घेण्याची शक्यता आहे. 

यांना दिली विश्रांती

या सीरिजमध्ये एमएस धोनी, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी विश्रांती देण्यात आलीये. अशात असे मानले जात आहे की, पांड्याची जागा एक ऑल राऊंडर म्हणून विजय शंकर घेऊ शकतो. 

याआधीही संधी पण...

शंकरला याआधी श्रीलंके विरूद्ध टेस्ट सीरिजसाठी भुवनेश्वर कुमारच्या जागेवर टीम इंडियात जागा देण्यात आली होती. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. २७ वर्षीय या खेळाडूने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं नाहीये. 

आयपीएलमध्ये इतकी बोली

विजय शंकर आयपीएलमध्ये धोनीची टीम चेन्नई सुपरकिंग्समध्ये खेळला आहे. यावेळी त्याला दिल्ली डेअरडेविल्सने ३.२ कोटी रूपयांना विकत घेतले आहे.