IPL मध्ये 'या' दिग्गज खेळाडूंचा पहिलाच सामना ठरला शेवटचा, नाव जाणून वाटेल आश्चर्य

आयपीएल हा रोमांचक आणि मनोरंजक खेळ आहे. ज्यामुळे लोकांना देखील तो पाहायला आवडतो.

Updated: Mar 29, 2022, 07:23 PM IST
IPL मध्ये 'या' दिग्गज खेळाडूंचा पहिलाच सामना ठरला शेवटचा, नाव जाणून वाटेल आश्चर्य title=

मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे. दरवर्षी सर्व देशाली दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळायला येतात. IPL सीझन 15 सुरू झाला आहे, यावेळीही अनेक मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. आयपीएल एक असे व्यासपीठ आहे जिथे खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली आहे. तर अनेक दिग्गज खेळाडू या आयपीएलमुळे घडले गेले आहे. इंडियन टीममध्ये देखील कर्तुत्ववान खेळाडूंना जागा दिली जाते. म्हणूनच तर हा खेळ सर्वच खेळाडूंसाठी महत्वाचा आहे. एवढंच काय तर, आयपीएल हा रोमांचक आणि मनोरंजक खेळ आहे. ज्यामुळे लोकांना देखील तो पाहायला आवडतो.

परंतु तुम्हाला माहितीय रोतोरात खेळाडूंना स्टार बनवणाऱ्या या खेळात अशा अनेक लोकांच्या नावांचा समावेश नाहीय जे मोठे खेळाडू आहेत. हे खेळाडू आपल्या संघाचा एक मोठा महत्वाचा भाग आहेत, परंतु तरीही त्यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना आयपीएलमध्ये फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्यानंतर ते या खेळातून गायब झाले.

अकीला धनंजय

अकिला धनंजया हा श्रीलंकेच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. परंतु तरीही त्याला आयपीएलमध्ये केवळ एकदाच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. या श्रीलंकेच्या ऑफस्पिनरने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. हा सामना धनंजयचा पहिला आणि शेवटचा सामना होता. अकिला धनंजय 2018 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.

या मोसमात धनंजय दिल्लीविरुद्ध खेळला होता. या सामन्यात धनंजयने 4 ओव्हर टाकले, मात्र त्याला एकही यश मिळाले नाही. या सामन्यानंतर धनंजयला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

मशरफे मुर्तजा

मशरफे मुर्तजा हा बांगलादेश संघाचा कर्णधार आहे आणि बांगलादेश क्रिकेटमधील एक मोठे नाव देखील आहे. पण असे असूनही मशरफे मुर्तजा याला आयपीएलमध्ये केवळ एकच सामना खेळता आला आहे.  मशरफी मोर्तझाला कोलकाता नाईट रायडर्सने 2009 साली विकत घेतले आणि त्याला डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.

2009 ची आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. हा सामना मोर्तझासाठी खूपच वाईट ठरला. या सामन्यात मोर्तझाने चार ओव्हरमध्ये 58 धावा दिल्या. त्यानंतर मात्र त्याच्यासाठी आयपीएलमधील हा सामना पहिला आणि शेवटचा ठरला.

युनूस खान

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू युनूस खानही आयपीएलचा एक भाग राहिला आहे. 2008 मध्ये, पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले होते, या हंगामात पाकिस्तानचे 11 खेळाडू सहभागी झाले होते, त्यापैकी एक होता युनूस खान. युनूसला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान दिले.

या सामन्यात युनूस खानने 7 चेंडूत 3 धावा केल्या. हा सामना युनूस खानसाठी आयपीएलमधील पहिला आणि शेवटचा सामना होता. यानंतर त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही.