मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले आणि 1-1 अशी बरोबरी केली. पहिल्या सामन्यात भारत पराभूत झाला होता. त्यानंतर विराट भारतात परतला आहे. संघात अनेक बदल झाले. शुभमन गिलचा संघात सलामीवीर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला.
मेलबर्न कसोटीत भारताचे दोन युवा खेळाडू शुबमन गिल आणि मो. सिराजला डेब्यू करण्याची संधी देण्यात आली आणि दोघांनीही चांगली कामगिरी केली. शुभमन गिलने पहिल्या डावात 45 धावा केल्या तर दुसऱ्या डावात नाबाद 35 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही शुमन गिलचे कौतुक केले. आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मायकेल हसीने ही त्यांचं कौतूक केलं आहे. पुढची 10 वर्षे शुबमन गिल भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल असं त्याने म्हटलं आहे.
हसी म्हणाला की, 'टीम इंडियासाठी ही शानदार वापसी आहे. पहिल्या टेस्टमध्ये ९० मिनिटांच्या खराब खेळीमुळे पराभव झाल्याचं रहाणेने म्हटलं होतं. शुभमन गिलबाबत बोलताना तो म्हणाला की, तो शानदार खेळाडू आहे. तो पुढचे १० वर्ष भारतासाठी खेळेल.'
हसी भारतीय गोलंदाजीबद्दल म्हणाला की, जेव्हा शमी दुखापतीमुळे बाहेर झाला. तेव्हा मला वाटले की याचा संघाच्या गोलंदाजीवर परिणाम होईल, परंतु तसे झाले नाही. सिराजने पोकळी भरून आपला सर्वोत्तम खेळ दाखवला.
पृथ्वी शॉच्या जागी दुसर्या कसोटीत शुभमन गिलला संधी देण्यात आली होती. त्याने संधीचा फायदा घेत चांगली फलंदाजी केली. आता दोन्ही देशांमधील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीला सुरू होणार आहे.