मुंबई : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी20 मालिका खेळते. या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. भारतीय खेळाडूंना एका खेळाडूने स्वार्थी म्हटले आहे. एका मुलाखतीत बोलताना त्या खेळाडूने एका घटनेची माहिती देत भारतीय खेळाडू स्वार्थी म्हटलंय. या विधानावर आता भारतीय चाहते चांगलेच भडकले आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने एका वेब शोला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने 2020-21 ला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी सामन्याचा किस्सा सांगितला. या सामन्याबद्दल बोलताना टीम पेन म्हणाला, टीम इंडियाचे काही खेळाडू खूप स्वार्थी होते, त्यांनी संपूर्ण मालिका धोक्यात आणली होती असे विधान पेन याने केले होते.
या मालिकेदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते. जिथे ते खुप मस्ती करत होते. या व्हिडिओवर बोलताना टीम पेन म्हणाला, "त्या चार-पाच लोकांनी संपूर्ण कसोटी मालिका धोक्यात आणली. कशासाठी? नॅंडोच्या चिप्सच्या एका वाटीसाठी किंवा ते कुठेही गेले, जसे की मला प्रामाणिकपणे स्वार्थी वाटते." असे तो म्हणालाय.
टीम पेनशिवाय सध्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही सांगितले की, त्यांना (भारतीय खेळाडूंना) पाहून आम्ही खूप अस्वस्थ झालो. भारतीय खेळाडूंमुळे काही मुलांना खूप त्रास झाला, विशेषत: जे त्यांच्या कुटुंबाशिवाय ख्रिसमस साजरा करत होते. अशा परिस्थितीत जेव्हा काही लोक बाहेर मौजमजा करत असतात आणि नियमांचे उल्लंघन करत असतात तेव्हा आपल्याला वाईट वाटते, असे तो म्हणालाय.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मायदेशात पराभूत करत 2-1 ने मालिका खिशात घातली.