आज रोहित शर्मा 'या' मराठमोळ्या खेळाडूला देणार मोठी संधी?

भारतीय कर्णधार रोहित शर्मा अंतिम T-20 साठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करू शकतो.

Updated: Nov 21, 2021, 11:35 AM IST
आज रोहित शर्मा 'या' मराठमोळ्या खेळाडूला देणार मोठी संधी? title=

मुंबई : पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय टीम मॅनेजमेंट कोलकातामध्ये होणाऱ्या तिसर्‍या टी-20 साठी संघात काही बदल करू शकते. जयपूरमध्ये चुरशीच्या लढतीत विजय मिळवल्यानंतर भारतीय टीमने रांचीमध्ये झालेल्या एकतर्फी सामन्यात किवी संघाचा 7 गडी राखून पराभव केला.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा अंतिम T-20 साठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करू शकतो. पहिल्या सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि दुसऱ्या सामन्यात हर्षल पटेलच्या पदार्पणानंतर दीपक चहरला ऐवजी यावेळी एक आयपीएल स्टार आवेश खानला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

फिरकीपटू युजवेंद्र चहलही संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दीपक चहरने दोन्ही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलच्या जागी चहलचा संघात समावेश होऊ शकतो.

या मराठमोळ्या खेळाडूला मिळणार संधी?

विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघ मॅनेजमेंट सर्व खेळाडूंना समान संधी द्यायला आवडेल. वर्ल्डकपपर्यंत चांगल्या खेळाडूंचा समूह तयार करता येईल. टेस्ट सिरीज अगोदर फलंदाजीतही केएल राहुल, ऋषभ पंत यांना विश्रांती देऊन ऋतुराज गायकडवाडला संधी दिली जाऊ शकते.

या दोन खेळाडूंचा पत्ता कट?

दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार हे खूप महागडे गोलंदाज ठरले आहेत. दुसऱ्या T20 सामन्यात कुमारने चार ओव्हरमध्ये 39 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. त्याचवेळी दीपकने चार ओव्हरमध्ये 42 धावा देत केवळ एक विकेट घेतली. अशी कामगिरी पाहता या दोघांना तिसऱ्या टी-20मध्ये विश्रांती दिली जाऊ शकते.