Tokyo 2020 Men’s Hockey : भारताकडून जबरदस्त पुनरागमन; जर्मनीवर घेतली आघाडी

Tokyo 2020 Men’s Hockey : जपानमधील टोकियो (Tokyo Olympics) येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या हॉकी सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली आहे.  

Updated: Aug 5, 2021, 08:37 AM IST
Tokyo 2020 Men’s Hockey : भारताकडून जबरदस्त पुनरागमन; जर्मनीवर घेतली आघाडी title=
Indian Hockey Team

मुंबई : Tokyo 2020 Men’s Hockey : जपानमधील टोकियो (Tokyo Olympics) येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या हॉकी सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली आहे. सामना सुरु होताच जर्मनीकडून (Germany) आक्रमक खेळी करण्यात आली.  बचावात्मक खेळी करणाऱ्या भारतीय (India) संघावर जर्मनीकडून दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु होता. पहिल्या क्वार्टरच्या दुसऱ्याच मिनिटाला जर्मनीने पहिला गोल करत आघाडी घेतली आणि आपली चुनूक दाखवून दिली. लाँग कॉर्नरचा जर्मनीने पुरेपूर फायदा घेत हा गोल केला. त्यानंतर भारतीय टीमनेही आक्रमक खेळ करत गोल करत जर्मनीवर मात केली आहे. भारताने आपला खेळ उंचावत 5-4 ची आघाडी घेतली आहे.

तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक (Olympics) सुवर्णपदक जिंकण्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न मंगळवारी झालेल्या उपांत्य लढतीत विश्वविजेत्या बेल्जियमकडून 2-5 अशा फरकाने पराभवामुळे भंगले  होते. परंतु आज भारताला जर्मनीविरुद्धची लढत जिंकून कांस्य पदक जिंकण्याची आशा होती. भारत आणि जर्मनीमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक इतिहासात आठ सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली आहे. यापैकी अखेरचे सुवर्णपदक मॉस्को ऑलिम्पिकमध्ये 1980 मध्ये मिळवले होते.

Tokyo Olympics Live: इतिहास रचने के लिए दम दिखा रहा भारत, जर्मनी पर 5-4 की बढ़त

भारताने आक्रमक खेळ करत तो उंचावला. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्यात वर्चस्व मिळवले. भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळी दाखवत पाचवा गोल केला. भारताने आणखी गोल करत 5-3  आघाडी घेतली. गुरजंतने हा गोल केला. त्याआधी रुपिंदर पालने पेनल्टी स्ट्रोक मारत भारताला चौथा गोल करुन दिला. भारताने सामन्यात 4-3 ने आघाडी घेतली.   

भारताकडून 3-3 ने बरोबरी

मात्र भारताने पुनरागम करत दुसरा गोल केला. हार्दिक सिंह याने केलेल्या गोलमुळे भारताला दिलासा मिळाला. यानंतर भारताने हाफ टाइमच्या आधी अजून एक गोल करत 3-3 ने बरोबरी केली. तर दुसऱ्या क्वार्टरपर्यंत जर्मनीने 2-1 आघाडी घेतली होती. यानंतर सलग अजून एक गोल करत जर्मनीने 3-1 ने भारताला पिछाडीवर टाकले. 

भारताचा पहिला गोल

दरम्यान, भारताने पहिल्या 15 मिनिटांमध्ये स्कोअर 0-1 होता. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीतने गोल करत बरोबरी केली.  तर दुसरीकडे पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल करण्याची संधी भारताने गमावली. तर मनप्रितकडून यावेळी चांगली खेळी पहायला मिळत होती.