Tokyo Paralympics | भारताला चौथं सुवर्ण पदक, बॅडमिंटन स्टार Pramod Bhagat ची सुवर्ण कामगिरी

भारतासाठी टोक्यो पॅरालिम्पिकमधील (Tokyo Paralympics) आजचा दिवस हा खास ठरलाय.

Updated: Sep 4, 2021, 05:47 PM IST
Tokyo Paralympics | भारताला चौथं सुवर्ण पदक, बॅडमिंटन स्टार Pramod Bhagat ची सुवर्ण कामगिरी title=

टोक्यो : भारतासाठी टोक्यो पॅरालिम्पिकमधील (Tokyo Paralympics) आजचा दिवस हा खास ठरलाय. भारताला चौथा गोल्ड मेडल मिळाला आहे. मेन्स एसएल3 प्रकारात (Badminton Men's Singles SL3) वर्ल्ड रॅंकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेल्या प्रमोद भगतने (Pramod Bhagat) भारताला गोल्ड मिळवून दिलं आहे. प्रमोदने फायनलमध्ये ग्रेट ब्रिटेनच्या डॅनियल बेथेलवर (Daniel Bethell)  मात करत सुवर्ण कमाई केली आहे. (Tokyo 2020 Paralympic Games India's Pramod Bhagat wins gold in badminton mens singles SL3  defeating Daniel Bethel in the final) 

प्रमोदची ऐतिहासिक कामिगिरी

पॅरालिम्पिकमध्ये यावेळेस पहिंल्यांदाच  बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला. प्रमोद पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. प्रमोदने डेनियलचा 21-14 21-17  ने पराभव केला.  

पंतप्रधानांकडून कौतुक 

प्रमोदने केलेल्या या सुवर्ण कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  (PM Narendra Modi)  त्याचं कौतुक केलं. मोदींनी ट्विट करत प्रमोदचं कौतुक केलं. प्रमोदने संपूर्ण देशाचं मन जिंकलंय. प्रमोद चॅम्पियन आहे. त्याने केलेल्या कामगिरीमुळे अनेकांना प्रेरमा मिळेल. प्रमोदने जिंकलेल्या सुवर्ण पदकासाठी त्याचं  खूप खूप कौतुक. तसेच भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं.  

मनोजला कांस्य पदक 

भारत (India) के ही दूसरे शटलर मनोज सरकार (Manoj Sarkar) ने टोक्यो पैरालंपिक (Tokyo Paralympics) के बैडमिंटन मेंस सिंगल्स क्लास एसएल3 इवेंट (Badminton Men's Singles SL3) में ब्रॉन्ज मेडल (Bronze Medal) अपने नाम किया. 

तर दुसऱ्या बाजूला याच प्रकारात मनोज सरकारने (Manoj Sarkar)  भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. मनोजने पुरुष एकेरीतील एसएल3 प्रकारात  (Badminton Men's Singles SL3) जपानच्या डेसुके फुजीहाराला (Daisuke Fujihara) पराभूत करत कांस्य पदकाची कमाई केली.

पॅरालिम्पिकमध्ये भारताला 17 मेडल्स

दरम्यान भारताने आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये एकूण 17 मेडल्सची कमाई केली आहे. यामध्ये 4 सुवर्ण, 7 सिल्वर आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वाधिक मेडल्स मिळवण्याच्या यादीत भारत 25 व्या क्रमांकावर पोहचला आहे.