Eng किंवा AUS नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये 'या' संघाकडून टीम इंडियाला धोका

ज्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही मैदानात गुडघे टेकायला लावले असा हा संघ टीम इंडियासाठी ठरू शकतो डोकेदुखी

Updated: Sep 4, 2021, 04:19 PM IST
Eng किंवा AUS नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये 'या' संघाकडून टीम इंडियाला धोका title=

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियनशिप टीम इंडियाने गमवल्यानंतर आता टी 20 वर्ल्डकपकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हा वर्ल्ड कप टीम इंडियाला मिळवणं गरजेचं आहेत. कर्णधार कोहलीच्या कारकीर्दीमध्ये आतापर्यंत एकही वर्ल्डकप किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवण्यात टीम इंडियाला यश आलं नाही. टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आणण्यासाठी टीम इंडियाकडे मोठी जबाबदारी आहे. 

17 ऑक्टोबरपासून UAE मध्ये टी 20 वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक देशांनी टी 20 World cup साठी आपला संघ जाहीर केला आहे. टीम इंडिया 7 सप्टेंबरला आपला टी 20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करणार आहे. सर्व देश तयारीला लागले आहेत. सध्या टीम इंडियासमोर इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियापेक्षा आणखी एका संघाकडून धोका आहे. 

टी 20वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश अफलातून कामगिरी करत आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलिया विरुद्धची 5 टी 20 सामन्यांची मालिका ही 4-1 च्या एकतर्फी फरकाने जिंकली. बांगलादेशने कांगारुना पराभूत करत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. यामुळे बांगलादेशचा विश्वास दुणावला. 

बांगलादेशला हाच विश्वास न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेत फायदेशीर ठरतोय. याच विश्वासावर आणि दमदार कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप असलेल्या न्यूझीलंडलाही पाणी पाजलंय. बांगलादेशने 3 टी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय.

टी 20 वर्ल्डकपमध्ये बांग्लादेश संघ सर्वांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. सध्याची स्थिती पाहता बांग्लादेश टीम इंडियासाठीही मोठी डोकेदुखी ठरू शकतो. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये देखील बंग्लादेश संघाने उत्तम कामगिरी केली आहे. 

आयसीसी टी -20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून UAEमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. आयपीएलचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच टी 20 वर्ल्ड कपसाठी सामने सुरू करण्यात येणार आहेत.