सानियाच्या त्या फोटोमुळे सोशल मीडियावर वाद, 'तू फक्त हेच कर मेडल मिळवणं... '

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सानियाला विशेष कामगिरी करण्यात यश न आल्यानं ती स्पर्धेतून बाहेर झाली आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला

Updated: Jul 29, 2021, 10:12 PM IST
सानियाच्या त्या फोटोमुळे सोशल मीडियावर वाद, 'तू फक्त हेच कर मेडल मिळवणं... '

मुंबई: भारताकडून टेनिस खेळणाऱ्या सानिया मिर्झाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये विशेष यश मिळालं नाही. सानिया मिर्झा आणि अंकिता रैना यांची जोडी पहिल्याच फेरीत टोकियो ऑलिम्पिकमध्ये बाहेर पडली. त्यांच्या या खराब कामगिरीनंतरही सायना खचली नाही. टोकियोतून बाहेर पडल्यानंतर ती इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह झाली. तिने आपले काही फोटो शेअर केले. 

सानियाने फोटो शेअर करताच सोशल मीडियावर युझर्सनी संताप व्यक्त केला आहे. सानिया मिर्झाने पराभवानंतर आपल्या इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. मात्र तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्याऐवजी लोकांनी तिच्यावर राग व्यक्त केला. एका युझरने म्हटलं की तू हेच कर मेडल मिळवणं तर तुला शक्य नाही'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

काही युझर्सनी सानियाच्या फोटोला फक्त लाईक केलं आहे. सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूसोबत लग्न केल्यानंतर तिच्या चाहत्यांची आणि अनेक भारतीयांची मोठी निराशा झाली होती. त्यानंतर तिच्यावर बरीच टीकाही करण्यात आली. सानिया मिर्झा हल्ली बरीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. याआधी तिने आपल्या पती आणि मुलासोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये 6-0, 6-10, 10-8 ने पराभूत झाल्यानंतर सानियाला टोकियोमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता सानिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाल्यानं काही युझर्सनी संताप व्यक्त केला आहे.