Tokyo Olympics | Hockey Team Indiaचा शानदार विजय, जपानवर 5-3 ने मात

हॉकी टीम इंडियाने (indian mens hockey team) यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केलं.   

Updated: Jul 30, 2021, 05:52 PM IST
Tokyo Olympics | Hockey Team Indiaचा शानदार विजय, जपानवर 5-3 ने मात title=

टोकियो : टीम इंडियासाठी टोकियो ऑल्मिपिकमधून (Tokyo Olympics)  आणखी एक आनंदाची बातमी आहे. हॉकी टीम इंडियाने विजयाची (Indian Hockey Team) नोंद केली आहे. टीम इंडियाने यजमान (Japan) जपानचा 5-3 ने पराभव केलाय. भारताकडून गुरजंत सिंहने सर्वाधिक 2 गोल केले. तर सिमरनजीत सिंह, शमशेर सिंह आणि निलकांता शर्माने प्रत्येकी 1 गोल करत गुरजंतला चांगली साथ दिली. तर जपानकडून टनाका, वतनाबे आणि मुराटा कजूमाने गोल केला. (Tokyo Olympics indian mens hockey team beat japan by 5 3 and entire quarter final round)
 

टीम इंडियाला आधी ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार मुसंडी मारत सलग 3 सामने जिंकण्याचा कारनामा केला. ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर भारताने स्पेन, अर्जेंटीना आणि आता जपानला धुळ चारली आहे. विशेष म्हणजे यजमान जपानला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.

असा रंगला सामना.....

टीम इंडियाने आधीचे 2 सामने जिंकले होते. त्यामुले विश्वास दुणावलेला होता. या आत्मविश्वासासह संघ जपान विरुद्ध 2 हात करण्यासाठी मैदानात उतरला. टीम इंडियाकडून हिला गोल सामन्यातील 13 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहने केला. हरमनप्रीतने पेन्लटी कॉर्नरवर गोलकीपर टाकाशी योशीकावाला चकवा दिला. यानंतर दुसऱ्या क्वार्टरला सुरुवात होताच टीम इंडियाने दुसरा गोल झळकावला. 

यानंतर 19व्या मिनिटाला जपानने जोरदार कमबॅक केल. डिफेंडर बीरेंद्र लाकडाच्या एका चुकीचा फायदा केंटा टनाकाने घेतला. त्याने गोलकीपर श्रीजेशला चकवा दिला.  पहिला हाफ संपेपर्यंत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. 

दुसऱ्या हाफमध्ये 3 गोल

दुसऱ्या हाफची सुरुवात होताच भारताला मोठा झटका बसला. जपानकडून कोटा वतनाबेने गोल लगावला. त्यामुळे जपान 2-2 च्या बरोबरीवर येऊन पोहचली. सामना रंगतदार स्थितीत पोहचला. मात्र यानंतर टीम इंडियाने पुन्हा मुसंडी मारत जोरदार कमबॅक केलं. शमशेरने 34 व्या मिनिटाला निलकांता शर्माच्या शॉटला आपल्या हॉकी स्टीकने वळवत गोल केला. यासह टीम इंडिया 3-2  ने आघाडीवर पोहचली.  यानंतर निलकांताने पुन्हा एकदा 51 व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे टीम इंडियाने 4-2 ने आघाडी घेतली.  

गुरजंत सिंहने 5 मिनिटांनंतर दुसरा गोल केला. वरुण कुमारकडून मिळालेल्या पासचा फायदा उठवत त्याने सहज गोल नोंदवला.  यासह भारताने 5-2 अशी एकतर्फी लीड घेतली. दरम्यान 59 व्या मिनिटाला जपानसाठी टनाकाने आणखी एक गोल केला. त्यामुळे जपानचे एकूण 3 गोल झाले. दरम्यान तोवर सामन्याची वेळ संपली होती. अशाप्रकारे भारताचा विजय झाला. 

दरम्यान शेवटच्या ग्रृप मॅचमध्ये टीम इंडियाने जपानला पराभूत करून दुसरे स्थान कायम राखले. हॉकी टीम इंडियाने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केलं. टीम इंडियाने 1980 नंतर ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच गटात दुसरे स्थान पटकावलंय.