भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

भारताचा दुसरा विराट कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला नेमकं झालं काय?

Updated: Oct 1, 2022, 06:53 PM IST
भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का! title=

Unmukt Chand Bruised Eye Pic : भारताला 2012 मध्ये ICC अंडर-19 वर्डकप जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदने पोस्ट केलेला फोटो  चांगलाच व्हायरल झाला आहे. उन्मुक्त चंदच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्याला डोळा उघडताही येत नसल्याचं दिसत आहे. डोळ्याला नक्की काय झालं असा सवाल नेटकरी करत आहेत. ( Unmukt Chand Posts Horrifying Image of his Bruised eye After Accident)

व्हायरल फोटोमध्ये काय? 
उन्मुक्त चंदच्या या फोटोमध्ये त्याचा डावा डोळा पूर्णपणे सुजलेला दिसत आहे. एवढंच नाही तर दुखापत अधिक गंभीर असेल तर त्याची दृष्टी जाण्याचाही धोका होता हे स्पष्टपणे दिसून येत आहे. 

खेळाडूसाठी कधीही एकसारखं काही नसतं. तुम्ही विजयी होता तर कधी तुम्हाला निराशाजनकही दिवस येतात. यातील काही दिवस असे असतात तुम्हाला मोठ्या जखमाही होतात. देवाच्या कृपेने मी एका मोठ्या अपघातातून वाचलो शुभेच्छांबद्दल धन्यवाद, असं उन्मुक्त चंदने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये, 29 वर्षीय उन्मुक्त चंदने दुखापत कशी झाली हे स्पष्ट केलं नाही. क्रिकेट खेळताना त्याच्या डोळ्याला दुखापत झाली की नुकताच त्याचा अपघात झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. 

 

टीम इंडियासोबत खेळण्याची संधी मिळाली नाही
टीम इंडियाचा दुसरा विराट कोहली म्हणून उन्मुक्त चंदची गणना केली जात होती. मात्र उन्मुक्त चंदला कधीही भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. उन्मुक्तच्या नेतृत्‍वाखाली 2012 च्‍या ICC अंडर-19 विश्‍वचषकावर नाव कोरलं होतं. उन्मुक्तने आतापर्यंत 67 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3379 धावा केल्या आहेत ज्यात 8 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.