या बॉलरने टाकली यंदाच्या सीजनमधली पहिली मेडन ओव्हर

कोणी टाकले आहेत सर्वाधिक मेडन ओव्हर

शैलेश मुसळे | Updated: Apr 17, 2018, 11:35 AM IST
या बॉलरने टाकली यंदाच्या सीजनमधली पहिली मेडन ओव्हर title=

कोलकाता : ईडन गॉर्डन्समध्ये खेळल्या गेलेल्या कोलकाता विरुद्ध दिल्ली या सामन्यात कोलकाताचा विजय झाला. ११ व्या सीजनमधील सामने आतापर्यंत रंगतदार होत आहेत. सर्वच सामने आतापर्यंत रंगले आहेत. यातच मेडन ओव्हर टाकण्याच्या यादीत आणखी एक नाव जोडलं आहे.

पहिली मेडन ओव्हर

मेडन ओव्हर टाकणाऱ्य़ांच्या यादीत ट्रेंट बोल्टचं नाव दाखल झालं आहे. ११ व्या सीजनमधील १३ व्या सामन्यात ट्रेंट बोल्टने हा कारनामा करुन दाखवला आहे. कोलकाताच्या क्रिस लिनला एकही रन करण्याची संधी त्याने दिली नाही. दिल्लीने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या ट्रेंट बोल्टने चांगली कामगिरी केली. पण संघाला विजय मिळवून देता आला नाही.

सर्वाधिक मेडन ओव्हर

प्रवीण कुमार याने आतापर्यंत सर्वात जास्त मेडन ओव्हर टाकले आहेत. त्याने एकून ११९ सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने ४२०.४ ओव्हरमध्ये १४ मेडन ओव्हर टाकले आहेत. ३६.१२ च्या रेटने त्याने ९० विकेट घेतले आहेत. प्रवीण कुमारची सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. त्याने 18 रन देत ३ विकेट घेतल्या आहेत.