मुंबईकर पृथ्वी शॉ ला एमसीएचे २५ लाखाचे बक्षीस

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन जगजेत्या बनलेल्या टीम इंडियावर जगभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच टीम आणि खेळाडूंवर बक्षिसांची खैरात सुरु आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 3, 2018, 09:56 PM IST
मुंबईकर पृथ्वी शॉ ला एमसीएचे २५ लाखाचे बक्षीस  title=

मुंबई : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन जगजेत्या बनलेल्या टीम इंडियावर जगभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच टीम आणि खेळाडूंवर बक्षिसांची खैरात सुरु आहे.

विजयानंतर इतके मिळणार बक्षीस

या विजयानंतर बीसीसीआयने १९ विश्व कप विजेती भारतीय टीमचे मुख्य कोच राहुल द्रविडला ५० लाखांचे बक्षीस प्रत्येक खेळाडूला ३० लाखांचे बक्षीस देण्याचे जाहिर केले आहे.

त्याचबरोबर इतर सदस्य, फिल्डिंग कोच अभय शर्मा आणि गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रेला २०-२० लाखांचे रोख बक्षीस देण्याचे जाहिर केले आहे.

पृथ्वी शॉला २५ लाख

अंडर १९ संघाचा कॅप्टन मुंबईकर पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) २५ लाखाचे इनाम जाहीर केले आहे.

एमसीएचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करुन ही माहीती दिली आहे.

 

शुभेच्छांचा वर्षाव

सीओएचे मार्गदर्शनाखाली बीसीसीआयने मुख्य कोचला सर्वात जास्त बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल एका जेष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, भारत गुरू-शिष्य परंपरेसाठी प्रसिद्ध आहे आणि गुरूला नेहमीच जास्त मिळते. कारण कोचचे मार्गदर्शन नेहमीच महत्त्वाचे ठरते.

विजयाबद्दल टीमला शुभेच्छा देताना समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले, 'मी अंडर १९ टीमला शुभेच्छा देतो. त्यांच्यामुळे देशाचा गौरव झाला.

राहुल अगदी इमानदारीत क्रिकेट खेळला आणि तेच गुण तो त्याच्या शिष्यांमध्ये उतरवत आहे.'