अंडर १९ विश्वचषक : टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियासमोर ३२९ धावांचे आव्हान

 टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. 

Updated: Jan 14, 2018, 10:01 AM IST
अंडर १९ विश्वचषक : टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियासमोर ३२९ धावांचे आव्हान  title=

नवी दिल्ली : १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या भारतीय संघाच्या अभियानाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानं सुरुवात झाली आहे. दरम्यान टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. ५० ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या ७ विकेटसच्या बदल्यात ३२८ धावा झाल्या. ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडीयाने ३२९ धावांचे आव्हान ठेवले आहे. 
 
पृथ्वी शॉ ९४ रन्स करुन बाद झाला. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या पृथ्वीने १०० बॉल्समध्ये ८ फोर आणि २ सिक्स लगावले. मंजोत आणि पृथ्वीमध्ये १८० रन्सची पार्टनरशिप झाली. 

 या जोडीने रॉबिन उथप्पा आणि शिखर धवन या जोडीचा १७५ रन्सचा रेकॉर्ड तोडला. मंजोतने ९९ बॉल्समध्ये १२ फोर आणि १ सिक्स मारून ८६ रन्स बनविले. 
 
 पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणा-या या संघासाठी पहिलाच पेपर अतिशय कठीण असणार आहे. पृथ्वी शॉच्या या संघाला द वॉल राहुल द्रविडचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. याआधी भारतीय संघानं मोहम्मद कैफ, विराट कोहली आणि उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली १९ वर्षाखालील विश्वचषक उंचावलाय. 
 
 त्यामुळे आता पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरतो का याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.