दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताविरूद्ध केला 'हा' विक्रम

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे.

Updated: Jan 14, 2018, 09:32 AM IST
दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताविरूद्ध केला 'हा' विक्रम  title=

दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे.

टॉस जिंकत दक्षिण आफ्रिकेचा संघ  पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. सलामी फलंदाजांनीही खेळाची शानदार सुरूवात केली आहे.  

दक्षिण आफ्रिकेने काय केला विक्रम ?  

दक्षिण आफ्रिकेच्या संघातून डीन एल्गर आणि एडेन मार्करम हे फलंदाज सलामीसाठी उतरले आहेत. त्यांच्या संयमी खेळाने दक्षिण आफ्रिकेची सुरूवात उत्तम ठरली आहे. 

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेशनमध्ये 27 ओव्हर्सचा खेळ पूर्ण केला आहे. त्यांनी 78 धावा केल्या आहेत. डीनने 26 तर एडेन मार्करमने 51 धावा केल्या आहेत. 

दक्षिण आफ्रिका आणि भारत दरम्यान गेल्या 25 वर्षांच्या काळात कसोटी सामन्यातील हा पहिलाच प्रसंग आहे. ज्यामुळे नवा रेकॉर्ड निर्माण झाला आहे. 

पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सत्रात एकही विकेट गमावली नाही. 
आजपर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान 18 कसोटी सामने रंगले. मात्र पहिल्या सत्रात विकेट न पडल्याची घटना पहिल्यांदा घडली आहे. 

आजतागायत भारताने दक्षिण आफ्रिकेत केवळ 2 कसोटी सामने जिंकले आहेत.