अंडर-१९ वर्ल्ड कप : भारताच्या भेदक बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Updated: Feb 4, 2020, 05:15 PM IST
अंडर-१९ वर्ल्ड कप : भारताच्या भेदक बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण title=

पॉटचेफस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानचा १७२ रनवर ऑलआऊट झाला आहे. भारताकडून सुशांत मिश्राने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिष्णोईला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. अर्थव अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वालला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं. पाकिस्तानकडून ओपनर हैदर अलीने ५६ रन तर कर्णधार रोहेल नाझिरने सर्वाधिक ६२ रनची खेळी केली.

अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण २३ मॅच झाल्या आहेत, यातल्या १४ मॅचमध्ये भारताचा आणि ८ मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला आहे, तर १ मॅच टाय झाली आहे. 

अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ सामने झाले आहेत, यातल्या ४ मॅचमध्ये भारताचा विजय तर ५ मॅचमध्ये पराभव झाला आहे. पण मागच्या ३ वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची मॅच २३ जानेवारी २०१० साली झाली होती.

भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास

अंडर19 वर्ल्‍डकप 1988:  पाकिस्‍तानने 68 रनने सामना जिंकला

अंडर19 वर्ल्‍डकप 1998:  भारताने 5 विकेटने सामना जिंकला

अंडर19 वर्ल्‍डकप 2002:  पाकिस्‍तानने 2 विकेटने सामना जिंकला

अंडर19 वर्ल्‍डकप 2004 : पाकिस्‍तानने 5 विकेटने सामना जिंकला

अंडर19 वर्ल्‍डकप 2006:  पाकिस्‍तानने 38 रन सामना जिंकला

अंडर19 वर्ल्‍डकप 2010:  पाकिस्‍तानने 2 विकेटने सामना जिंकला

अंडर19 वर्ल्‍डकप 2012 : भारताने एक विकेटने सामना जिंकला

अंडर19 वर्ल्‍डकप 2014:  भारताने 40  रन सामना जिंकला

अंडर19 वर्ल्‍डकप 2018 : भारताने 203 रनने मोठा विजय मिळवला

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x