भावा, Urvashi Rautela तुला बोलवतेय, चाहत्याने डिवचलं मग Rishabh Pant नेही सुनवलं

गेल्या काही काळापासून उर्वशी रिषभ पंतच्या मागे लागल्याचं चित्र होतं. दरम्यान याच मुद्द्यावरून रिषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताना दिसतोय.

Updated: Nov 7, 2022, 09:27 PM IST
भावा, Urvashi Rautela तुला बोलवतेय, चाहत्याने डिवचलं मग Rishabh Pant नेही सुनवलं title=

Rishabh Pant : भारतात बॉलिवूडप्रमाणे (Bollywood) क्रिकेट (Cricket) देखील तितकंच प्रसिद्ध आहे. या दोन्ही इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटींची नावंही एकमेकांसोबत जोडली जातात. अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नगाठ देखील बांधलीये. सध्या असंच एक चर्चेत असणाऱ्या जोडीचं नाव म्हणजे रिषभ पंत (Rishabh Pant) आणि उर्वशी रौतेला (Urvashi Rautela). गेल्या काही काळापासून उर्वशी रिषभ पंतच्या मागे लागल्याचं चित्र होतं. दरम्यान याच मुद्द्यावरून रिषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताना दिसतोय.

रिषभ पंत सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकप खेळतोय. यावेळी मैदानावर प्रॅक्टिस करत असताना एका चाहत्याने उर्वशीच्या नावावरून पंतला डिवचलं. यावेळी पंतने देखील या चाहत्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये, एक व्यक्तीने पंत बाऊंड्री लाईनच्या इथून जात असताना, भावा उर्वशी तुला बोलवतेय, असं सांगितलं. यावर पंतने तातडीने, 'जाके लेले फिर' असं उत्तर दिलंय. यावेळी पंत काहीसा रागात असल्याचं समजतंय.

उर्वशी पोहोचली होती ऑस्ट्रेलियात

टीम इंडिया वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर उर्वशी रौतेलाही ऑस्ट्रेलियाला पोहोचली होती. त्यावेळी चाहत्यांना ती टी20 वर्ल्ड कप 2022 चे सामने पाहण्यासाठी गेली असल्याचा समज झाला. मात्र काही दिवसांपूर्वी ती ऑस्ट्रेलियातून परतली असल्याचंही समोर आलं.

उर्वशीसोबत पंतचा वाद?

ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने म्हटलेलं की, छोटू भैय्या बॅट बॉल खेळला पाहिजे. मी कोणतीही मुन्नी नाही की बदनाम होईन. तर पंतने याचं उत्तर देताना म्हटलं की, बहिणी माझा पिछा सोड. इतकंच नाही तर यानंतर उर्वशी रौतेलाने अचानक कॅमेऱ्यासमोर येऊन माफीही मागितली होती.