Usman Khawaja : भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मुलीने केलं असं की...; उस्मान ख्वाजाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Usman Khawaja : शतक झळकावल्यानंतर ख्वाजा पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी त्याने त्याच्या 3 वर्षांच्या मुलीला घेऊन प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेतला होता. 

Updated: Jun 18, 2023, 06:36 PM IST
Usman Khawaja : भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मुलीने केलं असं की...; उस्मान ख्वाजाचा व्हिडीओ होतोय व्हायरल title=

Usman Khawaja : इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) यांच्या एशेज सिरीज खेळवली जातेय. एजबेस्टनमध्ये या सिरीजमधील पहिला सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ओपनर उस्मान ख्वाजाने ( Usman Khawaja ) शतक ठोकलं. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आणि ऑस्ट्रेलियाच्या ( Australia ) पहिल्या डावात त्याने शतक केलं. दरम्यान शतक झळकावल्यानंतर ख्वाजा पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी त्याने त्याच्या 3 वर्षांच्या मुलीला घेऊन प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेतला होता. 

मुलीला घेऊन प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये आला Usman Khawaja

या सामन्यानंतर उस्मान ख्वाजा ( Usman Khawaja ) प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पोहोचला. यावेळी त्याच्या सोबत त्याची चिमुकली 3 वर्षांची मुलगी आएशा देखील उपस्थित होती. यावेळी प्रश्नांना उत्तर देताना त्याचा आणि आएशाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये आपल्या वडिलांसोबत बसलेली आयेशा समोर असलेल्या माईकशी खेळताना दिसली. यावेळी तिने तिच्या लहान बहिणीविषयी देखील वडिलांना विचारलं. 8 मिनिटांच्या या पत्रकार परिषदेत कध आयेशा समोर असलेला ज्यूस पित होती, तर कधी माईक ऑफ करताना दिसली. यावेळी उस्मान ख्वाजा  ( Usman Khawaja ) म्हणाला, माझी मुलगी माझ्यापासून दूर राहू शकत नाही. 

ख्वाजाच्या   ( Usman Khawaja )दुसऱ्या मुलीचं नाव आयला आहे. प्रेस कॉन्फ्रेंस सुरु असताना आयेशाने वडिलांना विचारलं की, आयला ने म्हटलंय की... इतक्यात लगेच ख्वाजाने तिला थांबवलं आणि तिला म्हणाला, बेबी ती इथे नाहीये. ती तिच्या आईसोबत आहे. आपण लवकरच तिच्याकडे जाऊया. 

ख्वाजाचं इंग्लंडमध्ये पहिलं शतक

उस्मान ख्वाजाने  ( Usman Khawaja ) इंग्लंडमध्ये पहिलं शतक झळकावलंय. 26 वर्षांनंतर, एजबॅस्टनमध्ये शतक ठोकणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन ओपनर ठरलाय. दरम्यान ख्वाजाच्या टेस्ट करियरमधील 15 वं शतक होतं. 

एशेज सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात इंग्लंजने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सवर 393 रन्स करत इंग्लंडने डाव घोषित केलाय. यावेळी उस्मान ख्वाजाच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट गमावत 311 धावा केल्या आहेत.