बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवली मोठी जबाबदारी, द्रविडनंतर हे पद मिळणार

राहुल द्रविडची (Rahul Dravid) काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकापदी (Team India Head Coach) निवड करण्यात आली.   

Updated: Nov 15, 2021, 08:12 PM IST
बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवली मोठी जबाबदारी, द्रविडनंतर हे पद मिळणार title=

मुंबई : राहुल द्रविडची (Rahul Dravid) काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकापदी (Team India Head Coach) निवड करण्यात आली. याआधी राहुल द्रविड एनसीएचा (National Cricket Acadamy) संचालक होता. आता एनसीएचं संचालकपद रिक्त झालं आहे. त्या जागी आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटर व्ही व्ही एस लक्ष्मणची (V V S Laxman) नियुक्ती करण्यात येणार असल्याचं म्हंटलं जात आहे. व्ही व्ही एस लक्ष्मण एनसीएच्या संचालकपदांची सूत्र मिळणार असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. (v v s laxman will be new national cational cricket academy chief after to rahul dravid)

लक्ष्मणकडे मोठी जबाबदारी

"व्ही व्ही एस लक्ष्मण एनसीए प्रमुख असणार आहे", अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला माहिती दिली. लक्ष्मणने याआधीच आयपीएलमधील टीम सनरायजर्स हैदराबादचं मार्गदर्शकपद सोडलं आहे. तसेच हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी तो वृत्तपत्रांमध्ये लिखाणही करणार नाही.    

आधी ऑफर नाकारली?

बीसीसीआयने 4 डिसेंबरला कोलकात्यात वार्षिक सर्वसाधारण सभा घेणार आहे. या सभेत लक्ष्मणच्या नावाची घोषणा होऊ शकते. लक्ष्मणने ही ऑफर आधी नाकारल्याचं म्हंटलं जात आहे. कारण लक्ष्मण हैदराबादपासून शिफ्ट होण्यासाठी तयार नव्हता. एनसीए अकदामी ही बंगळुरुत आहे. एनसीएशी जोडल्या गेल्यानतंर लक्ष्मणला किमान 200 दिवस बंगळुरुत रहावं लागेल.