खराब फॉर्म असूनही विराटला संधी दिल्याने माजी क्रिकेटपटू भडकला, म्हणाला, "सेहवाग, युवराज..."

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याला अजूनही सूर गवसताना दिसत नाही.

Updated: Jul 11, 2022, 04:42 PM IST
खराब फॉर्म असूनही विराटला संधी दिल्याने माजी क्रिकेटपटू भडकला, म्हणाला, "सेहवाग, युवराज..."  title=

Team India: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याला अजूनही सूर गवसताना दिसत नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी 20 सामन्यांच्या मालिकेत विराट पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे त्याला संघातून बाहेर करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यानेही संघ व्यवस्थापनावर टीकास्त्र सोडलं आहे. विराट वारंवार फ्लॉप होत असूनही संधी मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. विराटने नोव्हेंबर 2019 पासून विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलं नाही. आता कोहली इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. पहिला सामना मंगळवारी ओव्हल येथे होणार आहे.

व्यंकटेश प्रसाद याने लिहिले आहे की, 'एक काळ असा होता की जेव्हा तुम्ही खराब फॉर्ममध्ये असता तेव्हा तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. सौरव, सेहवाग, युवराज, झहीर, अनिल कुंबळे आणि भज्जी हे तिघेही फॉर्मात नसल्यामुळे त्यांना वगळलं होतं. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि चांगली कामगिरी करून पुन्हा संघात स्थान मिळवले होते.'

'नियम खूप बदलले आहेत, जिथे आधी फॉर्म नसताना विश्रांती दिली जात होती. आता तसे नाही. प्रगतीचा हा योग्य मार्ग नाही. देशात इतकं टॅलेंट आहे की तो त्याच्या करिअरशी खेळू शकत नाही. मॅच विनर अनिल कुंबलेला अनेकदा संघाबाहेर केलं आहे. त्यामुळे आता कारवाई करणं गरजेचं आहे.', असं व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितलं.