Lata Mangeshkar | MS Dhoni च्या त्या गोष्टीमुळे लतादीदीं झाल्या होत्या अस्वस्थ...

दिग्गज गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी (Lata Mangeshkar Death) जगाचा निरोप घेतला आहे. 

Updated: Feb 7, 2022, 07:03 PM IST
Lata Mangeshkar | MS Dhoni च्या  त्या गोष्टीमुळे लतादीदीं झाल्या होत्या अस्वस्थ... title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : दिग्गज गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी (Lata Mangeshkar Death) जगाचा निरोप घेतला आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूळ झाला आहे. दीदींच्या निधनामुळे फक्त सिनेसृष्टी आणि संगीतसृष्टीच नाही तर क्रीडाक्षेत्रवरही शोक पसरला आहे. लता दीदींचं क्रिकेट प्रती असलेलं प्रेम सर्वश्रूत आहे. सचिनचे सामने पाहण्यासाठी त्यांनी अनेकदा गाण्यांचा सराव थांबवला होता, असं त्या स्वत: एकदा म्हणाल्या होत्या. (veteran singer lata mangeshkar had requested to mahendra singh dhoni about to dose not give retirment via tweet) 

दरम्यान, लता दीदी टीम इंडियाच्या एका दिग्गज खेळाडूच्या निवृत्तीच्या चर्चेमुळे अस्वस्थ झाल्या होत्या. तेव्हा दीदींनी ट्विटद्वारे त्या खेळाडूला निवृत्तीचा विचार करु नये, अशी विनंती केली होती.  

लता दीदींनी एक ट्विट करत आपल्या मनातील अस्वस्थतेला वाट मोकळी करुन देत आवाहन केलं होतं. टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरसाठी केलेल्या या ट्विटमध्ये दीदींनी "तुम्ही असं करु नका, तुमची देशाला गरज आहे", असं म्हणाल्या होत्या. 
  
टीम इंडियाचा 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला होता. तेव्हा महेंद्रसिंह धोनी कर्णधार होता. भारताचा पराभव झाल्याने धोनी निवृत्ती घेणार असल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चेमुळे दीदी अस्वस्थ होत्या. त्यामुळे दीदींनी धोनीला उल्लेखून ट्विट करत त्याला आवाहन केलं होतं. 

ट्विटमध्ये काय म्हटलं होतं?    

दीदींनी 11 जुलैला हे ट्विट केलं होतं. "धोनी, तुम्ही क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहात, असं माझ्या कानावर पडलं आहे. कृपया करुन तुम्ही असा काही विचार करु नका. देशाला तुमची गरज आहे. निवृत्तीचा विचारही मनात येऊ देऊ नका असं माझं वैयक्तिक आवाहन आहे", असं ट्विट दीदींनी केलं होतं.

lata