VIDEO: १ बॉलवर ६ रनची गरज, पण शॉट न खेळताच जिंकले!

शेवटच्या बॉलवर संपलेल्या अनेक मॅच क्रिकेट इतिहासात आहेत.

Updated: Jan 9, 2019, 09:31 PM IST
VIDEO: १ बॉलवर ६ रनची गरज, पण शॉट न खेळताच जिंकले! title=

डोंबिवली : शेवटच्या बॉलवर संपलेल्या अनेक मॅच क्रिकेट इतिहासात आहेत. पण भारतीय क्रिकेट रसिकांना नेहमीच जावेद मियादादनं शेवटच्या बॉलवर सिक्स मारून पाकिस्तानला जिंकवलेला क्षण आठवतो. १९८०च्या दशकात झालेल्या या मॅचमध्ये जावेद मियादादनं चेतन शर्मांच्या बॉलिंगवर सिक्स मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पण शेवटच्या बॉलवर ६ रनची आवश्यकता असताना बॅट्समन शॉट खेळत नाही आणि तरी टीमचा विजय होतो... हा व्हिडिओ तुम्ही बघितलात तर तुमचाही यावर विश्वास बसेल.

बॅटिंग करणाऱ्या टीमला शेवटच्या बॉलवर ६ रनची गरज होती. पण बॉलरनं पुढचे ६ बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर वाईड टाकले आणि बॅटिंग करणारी टीम मॅच जिंकली. डोंबिवलीच्या पडेलगावमधल्या आदर्श क्रिकेट क्लबच्या ग्राऊंडवर देसाई आणि जुनी डोंबिवलीमध्ये ही मॅच झाली. जुनी डोंबिवलीच्या टीमनं देसाईच्या टीमला विजयासाठी ७६ रनचं आव्हान दिलं. पण जुन्या डोंबिवलीच्या टीमनं शेवटच्या बॉलला माती करुन सामना गमावला. या मॅचनंतर शेवटची ओव्हर टाकणऱ्या बॉलरला जुन्या डोंबिवलीचे खेळाडू ओरडताना पाहायला मिळाले.