VIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली आहे.

Updated: Apr 22, 2018, 04:51 PM IST
VIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली आहे. स्मिथ आणि वॉर्नरच वर्षभरासाठी तर बँक्रॉफ्टचं नऊ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. याप्रकरणामध्ये वॉर्नर हा प्रमुख सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे तो आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होऊ शकणार नाही.

वॉर्नर करतोय हे काम

बंदी घालण्यात आल्यानंतर डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नर एका इमारतीचं बांधकाम करत असल्याचं दिसत आहे.

 

A couple of cuties on site this morning checking out the progress of their bedrooms. #dreamhome @mardiniconstructions @rolfockertarchitect

A post shared by Mrs Candice Warner (@candywarner1) on

वॉर्नर-स्मिथचं आर्थिक नुकसान

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बंदी घातल्यामुळे स्मिथ आणि वॉर्नरचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केलेल्या करारानुसार स्मिथला वर्षाला २ मिलियन आणि वॉर्नरला १.४ मिलियन डॉलर मिळणार होते. तसंच या बंदीमुळे वॉर्नर आणि स्मिथ आयपीएलही खेळू शकले नाहीत. त्यामुळे या सगळ्या पैशांवर त्यांना पाणी सोडावं लागलं आहे. या तिन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियातलं घरगुती क्रिकेट खेळायची परवानगी नसली तरी ते क्लब क्रिकेट खेळू शकतात, असं स्पष्टीकरण क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केलं आहे.