नेपियर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ८ विकेटनं दणदणीत विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे. भारतीय बॉलरनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला हा एकदिवसीय सामना जिंकता आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताला जिंकवून देणाऱ्या धोनीला या सामन्यात बॅटिंगची संधी मिळाली नाही. पण खेळपट्टी मागे धोनीनं पुन्हा एकदा आपण का ग्रेट आहोत हे दाखवून दिलं.
न्यूझीलंडच्या बॅटिंगवेळी ३८ व्या ओव्हरला धोनीनं कुलदीप यादवला सल्ला दिला आणि पुढच्याच बॉलला कुलदीपला विकेट मिळाली. ३७.५ ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं ९ विकेट गमावून १५७ धावा केल्या होत्या. त्यावेळी कुलदीप यादव बॉलिंग करत होता आणि ट्रेन्ट बोल्ट बॅटिंग करत होता. ९ बॉल खेळल्यानंतर बोल्टनं १ धाव केली होती.
'रोकेगा. ये आंख बंद करके रोकेगा. इसको इधर से डाल सकता है. इधर से अंदर नहीं आएगा.' असं धोनी कुलदीपला म्हणाला. यानंतर दुसऱ्या बाजूला उभा असलेला टीम साऊदी ट्रेन्ट बोल्टकडे गेला आणि त्याला काहीतरी समजावलं. यानंतर धोनीनं पुन्हा कुलदीपला सल्ला दिला. 'धीमा नहीं करना इसे', असं धोनीनं कुलदीपला सांगितलं. धोनीच्या या सल्ल्यानंतर कुलदीप यादव 'राऊंड द विकेट' बॉलिंग करायला आला. याच बॉलला रोहित शर्मानं स्लिपमध्ये ट्रेन्ट बोल्टचा कॅच पकडला आणि न्यूझीलंडचा संघ ऑल आऊट झाला.
This is it. there will be no one like MS Dhoni in this world. he just predicted what's gonna happen on next delivery #NZvIND #dhoni pic.twitter.com/KVLP4kY0uT
— Manish (@Man_isssh) January 23, 2019
ट्रेन्ट बोल्ट आऊट झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ ३८ ओव्हरमध्ये १५७ धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीला ३, युझवेंद्र चहलला २ आणि केदार जाधवला १ विकेट मिळाली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननं सर्वाधिक ५४ रन केले. या आव्हानाचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला. शिखर धवननं नाबाद ७५ रनची खेळी केली.