Sport News : आताच पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची गोलंदाजी कमजोरी ठरली. उमरान मलिकला संधी दिली नाही म्हणून अनेक दिग्गजांनी निवड समितीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 150 किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरानला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी द्यायला हवी होती, असं अनेकांचं म्हणणं आहे. अशातच आता उमरानला तोडीस तोड असा नवीन गोलंदाज आला आहे. (Video of Jammu Kashmirs Wasim Bashir bowler is going viral Sport Marathi News)
वसीम बशीर असं युवा गोलंदाजाचं नाव आहे. 145 किमी वेगाने वसीम गोलंदाजी करत असून जम्मू-काश्मीर अंडर-25 संघाचा भाग आहे. वसीमने IPL 2023 च्या लिलावासाठी नोंदणी केली तर अनेक फ्रेंचायझी त्याला घेण्यासाठी मोठी रक्कम मोजू शकतात. बशीर त्याच्या कामगिरीने छाप सोडताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर बशीरच्या गोलंदाजीचा व्हिडीओ खूप शेअर केला जात आहे.
बशीरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये दिसत आहे की, बशीरचा चेंडू वेगाने आल्यामुळे बॅट्समनला सोडून देत आहे. काहींना तर चेंडू लागलासुद्धा आहे. भारतीय संघाला आताच्या घडीला अशाच युवा आणि वेगवान गोलंदाजांची गरज आहे.
You asked for a LEFT-ARM QUICK, here we go:
Basit Bashir, a 19-year-old left-arm pacer from #Kashmir, is 6’3” tall, bowls super quick and can swing it both ways! He’s also currently a part of the J&K U-25 team! Has done well at U19 level! Hope #IPL teams would take a look at him! pic.twitter.com/7vw31ffpAS— Mohsin Kamal (@64MohsinKamal) November 19, 2022
दरम्यान, बशीरचा बाउन्सर पाहून चांगल्या चांगल्या फलंदाजांकडे याचं उत्तर नसेल. कारण वेग आणि बाउन्सर दोन्ही एकत्र होऊन आलेला चेंडू सहज खेळता येत नाही. हा व्हिडीओ जम्मू-काश्मिरच्या एका पत्रकाराने शेअर केला आहे.