VIDEO :...म्हणून पाकच्या कट्टर फॅननं 'तिरंगा' हातात घेऊन टीम इंडियाला सपोर्ट केलं

भारत विरुद्ध बांग्लादेशच्या फायनल मॅचमध्ये बशीर चाचांनी भारताला सपोर्ट केल्याचं जगानं पाहिलं...

Updated: Oct 9, 2018, 04:07 PM IST
VIDEO :...म्हणून पाकच्या कट्टर फॅननं 'तिरंगा' हातात घेऊन टीम इंडियाला सपोर्ट केलं title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तान... दोन देशांतल्या द्वेषाच्या जितक्या कहाण्या त्याहून कित्येक कहाण्या आहेत या दोन देशांमध्ये राहणाऱ्या माणसांतल्या मानवतेच्या... त्यांच्या एकमेकांप्रती असलेल्या प्रेमाच्या, आदराच्या... खेळाच्या मैदानावर भले खेळाडून एकमेकांना टशन देतात... मात्र त्यापलिकडे जाऊन ते आपल्या खिलाडून वृत्तीचं अनेकदा प्रदर्शन करतानाही दिसतात... नुकत्याच झालेल्या आशिया कप २०१८ मध्ये भारत आणि पाकिस्तान मॅच दरम्यान असाच एक सुंदर क्षण पाहायला मिळाला... टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं 'कट्टर पाकिस्तानी क्रिकेट फॅन' बशीर चाचा यांची भेट घेतली... आणि मग बशीर चाचा टीम इंडियालाही चिअर करण्यासाठी मैदानात पोहचलेले दिसले. 

बशीर सर्व मॅचमध्ये पाकिस्तानी टीमला प्रोत्साहन देताना दिसले हते. परंतु, भारत विरुद्ध बांग्लादेशच्या फायनल मॅचमध्ये बशीर चाचांनी भारताला सपोर्ट केल्याचं जगानं पाहिलं... 

ही जादू कशी घडली याचा खुलासा बशीर चाचांनी एका मुलाखतीदरम्यान केला... 'रात्री १२ वाजता हयात हॉटेलच्या माझ्या रुमची बेल वाजली... दरवाजा उघडून पाहिलं तर समोर धोनी... आम्ही एकाच मजल्यावर होतो... धोनीनं माझ्या रुममध्ये येऊन सही केलेली एक जर्सी मला भेट दिली... म्हटलं... चाचा नवीन, ब्रॅन्ड न्यू... तुम्ही हे शर्ट घाला'... आणि याच कारणामुळे बशीर चाचांनी फायनलमध्ये बांग्लादेश - भारत मॅच दरम्यान ही जर्सी परिधान केली होती. 

 

पाकिस्तानी क्रिकेट टीमचे फॅन असलेले बशीर चाचा शिकागोमध्ये फायनल मॅचमध्ये भारतीय जर्सी परिधान करून हातात तिरंगा फडकावत टीम इंडियाला प्रोत्साहन देताना दिसले होते.